दुचाकी वाहनांवर कारवाई करून ठोटावला दंड… धुळे दि.२६ (गोकुळ देवरे) धुळे शहरातील बुलेट वाहन धारक हे वाहनाच्या वनावट मध्ये फेरफार करुन वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर वाजवितात त्यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणापासून नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मोठ्याने आवाज करणारे सायलेन्सर बसविल्यामुळे विशेपता बालक व वयोवृध्द यांना त्रास होवु नये म्हणून दिनांक २६ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी १३.०० वाजे पावेतो शहरातील जयहिंद ज्युनिअर कॉलेज, दत्त मंदिर चौक, महाजन हायस्कूल, संतोषी माता चौक, वारापत्थर, मामलेदार कचेरी चौक या वरदळीच्या ठिकाणी शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे सह विशेष मोहिम राबवून बुलेट वाहनांच्या सायलेन्सरची तपासणी केली त्यात एकुण ३५ इतक्या वाहन धारकांनी त्यांचे वाहनास कर्नकर्कश्य आवाज करणारे सायलेन्सर बसविलेले आढळुन आले त्यांचेवर मोटर वाहन कायदा कलम १९८ प्रमाणे कारवाई करण्यात आलो असुन त्यात सदर मोटर वाहन कायदया अंर्तगत ३५ इतक्या केसेस करण्यात आल्या असुन रुपये ३५०००/- दंड करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि मा. पोलीस अधीक्षक सो श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक साो किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन यापुढे देखील अशाच प्रकारची कारवाई सुरुच राहणारआहे. तरी धुळे शहरातील बुलेट वाहन धारक यांनी वाहतुक नियमांचे पालन कराये आपल्या बुलेट बाहनातील सायलेन्सर मध्ये कोणताही अनावश्यक बदल करु नये असे आवाहन भुषण कोते प्रभारी अधिकारी शहर वाहतुक शाखा धुळे यांनी केले आहे.
byloksahi.varta.news
-
0