धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथे रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी यांचा फौज फाटा माघारा वाघाडी दि.०८ - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथे रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आपला फौज फाटा घेऊन वाघाडी गावातील अनिल रमण पवार यांच्या शेता जवळ आले असता वाघाडी गावातील अनिल रमण पवार, भारती खैरात हे दोन वेगवेगळे खातेदार असताना देखील भूसंपादन विभागाने कोर्टामध्ये वर्ग केला आहे असून हे पैसे वेगवेगळ्या खात्यामधून टाकण्यात यावी अशी मागणी अनिल रमण पवार यांनी सर्कल व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे अनिल रावण पवार यांचे म्हणणे आहे की माझ्या अधिकाऱ्याची जी शेती आहे त्याचे जे पैसे आहेत ते पैसे मला माझ्या खात्यावर मिळावे तसेच माझ्या बहिणीचे पैसे तिच्या खात्यावर मिळावे तरच मी हा शेतीचा ताबा देईल तसेच बाजूच्या शेतातील विहीर त्यांच्या शेतात आहे त्या विहिरीचा पेमेंट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे टाकण्यात आले आहे असा वाद असल्यामुळे दुसऱ्यांदा ताबा घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह रेल्वेचे कर्मचारी व पोलिसांचा फौजफाटा घेऊन प्रशासन आपला ताबा घेण्यासाठी आले आहे यावेळी उपस्थित रेल्वे प्रशासनाकडून एक्सेल सीनियर इंजिनियर समीर कुमार, रेल्वे प्रतिनिधी भूषण रघुवंशी, सर्कल स्वाती कोळी, तलाठी हर्षला सोनवणे, नरडाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र माने, यांच्यासह शेतकरी अनिल रमण पवार ईश्वर पाटील, दिनेश दिलीप पवार, प्रमोद दिलीप पवार व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शेवटी रेल्वे प्रशासनातील अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या मध्यस्थीने शिरपूर प्रांत शरद मंडलिक साहेबांसोबत मीटिंग करून यातून मार्ग काढू असे झाल्यानंतर संपूर्ण ताफा हा परत रवाना झाला. byloksahi.varta.news -July 08, 2026
आरक्षण वर्गीकरण विरोधी समिती शिंदखेडा तालुका सर्वपक्षी या च्या वतीने घेण्यात आलेली मीटिंग संपन्न शिंदखेडा दि.०६ - शिंदखेडा येथे दिनांक ५ जुलै रोजी राहुल भाऊ पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयावर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती शिंदखेडा तालुका सर्वपक्षीय मीटिंग घेण्यात आली उपवर्गीकरण विरोधातसमिती गठन करून १३ जुलै रोजी भव्य दिव्य आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा आयोजित केला आहे शिंदखेडा तालुक्यातील आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्व आंबेडकरी समाजाने व एसी कॅटेगिरी मध्ये ५९ या जाती आहेत त्या सर्व समाज बांधवांनी १३ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेश द्वार जवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपले नम्र आयोजक:-आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती शिंदखेडा तालुका मोर्चेमध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन एकतावादी, आदिवासी समाज, मुस्लिम समाज, व सर्व बहुजनवादी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत रामभाऊ माणिक दोंडाईचा नगरसेवक, राहुल भाऊ पाटोळे शिंदखेडा नगरसेवक, दीपक अहिरे शिंदखेडा नगरसेवक, अक्षय चव्हाण दोंडाईचा नगरसेवक, अरविंद कुमार मंगासे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी एकतावादी, संजय पाटोळे rpi जिल्हा उपाध्यक्ष धुळे, कैलास आखाडे rpi तालुकाध्यक्ष, प्रवीण मनसे युवक जिल्हाध्यक्ष एकतावादी, मनोज पानपाटील पॅंथर सेना तालुकाध्यक्ष, जतिन बोरसे, विजय मोरे, श्रीकांत बैसाणे, बाळा इशी, नवनीत बागले जिल्हाध्यक्ष, रोहित पाटोळे, संजय पानपाटील, रवींद्र इशी, रावसाहेब पाटोळे, किरण शिरसाट, मनोज बोरसे, दीपक बोरसे, सागर बोरसे, अजय पाटोळे, बबलू कापुरे, तोसीब शेख, सोनू कुंभार, सिद्धार्थ कुवर, कुणाल पाटोळे, यशवंत पाटोळे, व आंबेडकरी समाजाचे शिंदखेडा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते byloksahi.varta.news -July 08, 2026
सरवड गावाचे भूमिपुत्र प्रा. मच्छिंद्र ठाकरे यांना Ph. D. पदवी प्राप्त धुळे दि.०८- धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे, भाऊसाहेब ना . स. पाटील साहित्य आणि मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा .मच्छिंद्र गुलाब ठाकरे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या माननीय कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते 'विद्यावाचस्पती' (पीएच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील सरवड या लहानशा गावातील एका आदिवासी कुटुंबात जन्माला आलेले मच्छिंद्र ठाकरे हे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत करत हिंदी या विषयातील सेट, पी.एच.डी. अशा परीक्षा उत्तीर्ण करतात आणि प्राध्यापक पदापर्यंत पोहचतात. त्यांचा हा प्रवास आदिवासी तरुणांसाठी दिशादर्शक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मजुरी करत आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी भागवला. त्याचा जन्म आदिवासी समूहातील भिल्ल या जातीत झाला. घरची परिस्थिती बेताचीच असताना शिक्षणाची असणारी ओढ त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. संशोधनाच्या काळातच मोठा भाऊ युवराज ठाकरे यांच्या अकाली निधनाने मच्छिंद्र ठाकरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संशोधनाच्या काळात दोन मोठे भाऊ आणि वडिलांच्या निधनाचे दुःख असताना ते कुठे ही खचले नाहीत. काहीही झाले, तरीही त्यांनी आपल्या संशोधनातील ओढ कमी होऊ दिली नाही. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच ते आज सरवड या गावातील पहिले नेट, सेट आणि पी.एच.डी. या बहुमानाच्या पदव्या घेऊन प्राध्यापक या पदावर विराजमान झालेले प्राध्यापक ठरलेले आहेत. त्यांच्या या यशामध्ये सरवड गावातील ग्रामस्थ सहभागी आहेत.आपल्या आदिवासी बोलीतील उच्चारण करायची कायमची सवय त्यांनी प्रयत्नपूर्वक सोडून हिंदी सारख्या भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले. शिक्षणाने माणूस निर्भय बनला पाहिजे, या स्वामी विवेकानंदांच्या विधानाचा प्रत्येक डॉ. मच्छिंद्र ठाकरे यांच्या जीवनात प्रत्यक्षात येताना दिसतो. बहुजनांसाठी स्थापन झालेल्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार (धुळे ग्रामीण) मा. कुणालजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ .संजय टी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, माजी प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ, सध्याचे प्राचार्य डॉ. जितेंद्र तलवारे, मार्गदर्शक डॉ. प्रमोद पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. byloksahi.varta.news -July 08, 2026
मालेगावमध्ये लोकशाहीधडक मोर्चाचा शेतकऱ्यांसाठी एल्गार. प्रशासनाला अल्टीमेटम.... मालेगाव दि.२८- मालेगावमध्ये लोकशाहीधडक मोर्चाचा शेतकऱ्यांसाठी एल्गार. प्रशासनाला अल्टीमेटम.... मालेगाव तसेच मालेगाव तालुक्यातील निमगाव निमगाव खुर्द भूतपाडे, येसगाव, खायदे भुईगव्हाण, चिंचगव्हाण मथुरपाडे, साकोरी, मळगाव निमगुले व शेजारील सर्व खेडे येथील शेतकऱ्यांना पीककर्ज, राशनकार्ड, जातीचे दाखले, घरकुल, राशनकार्ड ऑनलाईन,अशी ही आमच्या भागातील खेड्यापाड्यांची गंभीर समस्या आहे.तसेचपिक कर्जासाठी अनेकजाचक अटी लादू नये शेतकऱ्यांना सोयीस्कर कसं होईल. शेतकऱ्यांना त्वरित लाभ कसा मिळेल याकडे जास्त कल असावा. तसेच महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याआदेशांची अंमलबजावणी करण्याची जाहीर मागणी.लोकशाही धडक मोर्चाकडून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने योग्य ते सहकार्य नाही केले.तर पुढील काळात ते अमरण उपोषण करतील असं स्पष्ट सांगितलंय.याबाबत लोकशाही धडक मोर्चाने निवेदन देत अल्टिमेटम दिला आहे. सदर या आंदोलनाचे मार्गदर्शनशेखर बाळसाहेब पगार संस्थापक अध्यक्ष. लोकशाही धडक मोर्चा .व आंदोलनाचे नेतृत्व लोकशाही धडक मोर्चा चे नाशिक जिल्हा अध्यक्ष. अनिल भाऊ जाधवकृष्णा भाऊ दुधेकर नेते लोकशाही धडक मोर्चा . भुतपाडे (निमगाव)सूर्यवंशी दादा. अहिरे निलेश बापू सोनवणे नेते लोकशाही धडक मोर्चा चंदनपुरी. महिला नेत्या सौ.महीरे ताई साहेब आदिवासी नेते दादासाहेब पवार. मालेगाव नगरपालिकेचे मा. नगरसेवक विठ्ठल भाऊ बर्वे यांचे ही मार्गदर्शन लाभले. तसेच मालेगाव तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते समाजबांधव यांचेही नेतृत्व तथा मार्गदर्शन लाभले. byloksahi.varta.news -August 28, 2025
एन सी सी प्रशिक्षण शिबिरात जवाहर फाउंडेशन मार्फत मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार एन सी सी प्रशिक्षण शिबिरात जवाहर फाउंडेशन मार्फत मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळे मार्फत जिल्हा क्रीडा संकुल येथे ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८ जुलै २०२५ ते १७ जुलै २०२५ या कालावधी अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० जुलै २०२५ रोजी जव्हार फाउंडेशन एसीपीएम मेडिकल व डेंटल कॉलेज धुळे यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी शिबिरातील ४५० विद्यार्थ्यांचे दंत तपासणी करण्यात आली. त्याच प्रमाणे दंत स्वच्छता , काळजी या बद्दल माहिती डॉक्टर. दिव्या घुणे यांनी सांगितले की किशोर वयात मुलांचे दात वेडेवाकडे असतात यावर योग्य उपचाराची गरज असते वेळेत उपचार न झाल्यास अधिक समस्या वाढू शकतात आणि एका दाताना कीड लागल्यास सर्व दात बाधित होऊ शकतात दात चांगले असल्यास अन्नाचे चर्वण चांगले होऊ शकते आणि पचन क्रियाही सुधारते या कारणास्तव सर्वांनी दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. हे मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर. पूजा कुंभारगावे डॉक्टर.सोनिया अहिरे डॉक्टर. मयुरी सोनवणे यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली. दिनांक १० जुलै रोजी विद्यार्थी यांना मॅप सेटिंग,. २२ रायफल की जानकारी, ऑर्गनायझेशन ऑफ एनसीसी अँड रँक यावर माहिती देण्यात आली.तसेच कॅप्टन डॉ.सुनील पाटील यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅप्टन डॉ .सुनील पाटील , लेफ्टनंट डॉ .राजेश चंदनशिव , सुभेदार मेजर तिलकराज, फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ, सेकंड ऑफिसर राहुलसिंग राजपूत, फर्स्ट ऑफिसर बोरसे ,ट्रेनिंग जेसीओ करमजीत सिंग, बी एच एम दीपक पाटील, हेड क्लर्क प्रदीप शिंदे, ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी , सीटीओ आश्विनी देशमुख , राकेश पावरा परिश्रम घेत आहेत. byloksahi.varta.news -July 11, 2025
एनसीसी प्रशिक्षण शिबिर धुळे येथे विद्यार्थ्यांना कवायतीचे धडे धुळे ०९ -एनसीसी प्रशिक्षण शिबिर धुळे येथे विद्यार्थ्यांना कवायतीचे धडे ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळे मार्फत जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक ०८ जुलै ते १७ जुलै २०२५ या कालावधी अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यां चा शारीरिक व बौद्धिक विकासात वाढ होण्याच्या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षित केले जाते . एनसीसी शिबिरातील ४६१ विद्यार्थी सहभागी झालेले आहेतशिस्तबद्ध आणि वेळेच्या चौकटीत प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन डॉ .सुनील पाटील , लेफ्टनंट डॉ .राजेश चंदनशिव , सुभेदार मेजर तिलकराज, फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ, सेकंड ऑफिसर राहुलसिंग राजपूत, फर्स्ट ऑफिसर बोरसे ,ट्रेनिंग जेसीओ करमजीत सिंग, बी एच एम दीपक पाटील, हेड क्लर्क प्रदीप शिंदे, ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी , सीटीओ आश्विनी देशमुख , राकेश पावरा शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. byloksahi.varta.news -July 09, 2025
एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराला धुळे येथे उत्साहात प्रारंभ धुळे ०९ - देशसेवेतील एनसीसीचं मोलाचं योगदान – कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता यांचा संदेश देशातील युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवून त्यांना सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) स्थापना करण्यात आली आहे. युवकांनी एनसीसीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन देशसेवेत आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता यांनी केले.ते मंगळवारी दि. ०८ जुलै धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झालेल्या एनसीसीच्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील एकूण ४६१ छात्रसेनिक सहभागी झाले आहेत. शिबिरामध्ये छात्रसेनिकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश, पेट्रोल, फायर फायटिंग, यासोबतच आपत्कालीन परिस्थितीतली तयारी, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा आणि भारतीय सैन्याचा इतिहास यासंबंधी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.शिबिराच्या कालावधीत फायरिंग सराव व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व छात्रसेनिकांसाठी अल्पोपहार, भोजनाची व निवासाची सुविधा एनसीसी बटालियनतर्फे करण्यात आली आहे.शिस्तबद्ध आणि वेळेच्या चौकटीत प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन सुनील पाटील , लेफ्टनंट चंदनशिव , सुभेदार मेजर तिलकराज, फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ, सेकंड ऑफिसर राजपूत, फर्स्ट ऑफिसर बोरसे ,ट्रेनिंग जेसीओ करमजीत सिंग, बी एच एम दीपक पाटील, हेड क्लर्क प्रदीप शिंदे, ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी , सीटीओ आश्विनी देशमुख शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. byloksahi.varta.news -July 09, 2025