इमर्जन्सी डायल ११२ ला खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांचा चोप साक्री दि.२५ (परवेज सैय्यद) - साक्री तालुक्यातील सतमाने गावाचा एका नागरिकाने तत्काळ पोलीस मदत क्रमांक ११२ ला कॉल करुण मस्करी करण्याची बातमी समोर आली आहे. पोलीस तात्काळ मदत प्रणाली दूरध्वनी क्रमांक डायल ११२ वर दिनांक २५/०६/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजून तें ०३:५४ मिनिटांनी निजामपूर पोलीस स्टेशन येथे कॉल केला गेला कॉलर नामे भटू पंडितरावं पदमोर वय ३० रा. सतमाने ता. साक्री जि. धुळे या व्यक्तीने कॉल करुन माहिती देत पोलिसांना सांगितले की एका जोतिष ला काही लोक मारहाण करत आहे. आपण लवकर घटना स्थळी पोहचावे असे कळवले असता खात्री करण्यासाठी तात्काळ निजामपूर पोलीस स्टेशनं चे पो. स. इ गवळी साहेब यांच्या आदेशा नुसार पो.को. रतन मोरे, पो. को. चव्हाण, पो. को दुरगुडे, सह शासकीय वाहना ने सतमाने या गावी रवाना झाले सतमाने गावात पोचल्यानंतर डायल ११२ कॉलर पंडितरावं पदमोर याला भेट घेऊन त्या घटने बद्दल विचारपूस केले असताना कॉलर भटू पदमॉर ह्याने उडवा उडवी चे उत्तर देत सांगीतले की इथे कुठेच अस झाले नाही, चुकीने कोणी केला असेल कॉल . असे सांगण्यात आले सदर घटनेची शानिशा तपासणी कार्यासाठी गावातील पोलीस पाटील सरपंच व दोन पंचांसह गावात जाऊन त्या घटनेची खात्री केली असता त्या गावात कोठेही असे काही झाले नाही. याबाबत खात्री केली म्हणून कॉलर ने डायल ११२ अतिशय तात्काळ महत्वाची प्रणालीवर खोटी माहिती दिली व प्रशासनाचा वेळ वाया घालवीला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील घटनातील खोटी माहिती देणारा व्यक्ती नामे भटू पंडितरावं पदमोर ह्याने जाणून-बुजून ही माहिती खोटी आहे. या व्यक्तीने डायल ११२ वर कॉल केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर भा. द. वी. कलम १७७ प्रमाणे निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स. पो. नी गायकवाड, पो. स. इ विशाल पाटील, पो. स. इ कोळी यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे. प्रशसांना तर्फे आव्हान करण्यात आले आहे कि.अशी खोटी माहिती देणाऱ्या वरती तात्काळ कारवाई केली जाईल.
byloksahi.varta.news
-
0