-->

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथे रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी यांचा फौज फाटा माघारा वाघाडी दि.०८ - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथे रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आपला फौज फाटा घेऊन वाघाडी गावातील अनिल रमण पवार यांच्या शेता जवळ आले असता वाघाडी गावातील अनिल रमण पवार, भारती खैरात हे दोन वेगवेगळे खातेदार असताना देखील भूसंपादन विभागाने कोर्टामध्ये वर्ग केला आहे असून हे पैसे वेगवेगळ्या खात्यामधून टाकण्यात यावी अशी मागणी अनिल रमण पवार यांनी सर्कल व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे अनिल रावण पवार यांचे म्हणणे आहे की माझ्या अधिकाऱ्याची जी शेती आहे त्याचे जे पैसे आहेत ते पैसे मला माझ्या खात्यावर मिळावे तसेच माझ्या बहिणीचे पैसे तिच्या खात्यावर मिळावे तरच मी हा शेतीचा ताबा देईल तसेच बाजूच्या शेतातील विहीर त्यांच्या शेतात आहे त्या विहिरीचा पेमेंट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे टाकण्यात आले आहे असा वाद असल्यामुळे दुसऱ्यांदा ताबा घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह रेल्वेचे कर्मचारी व पोलिसांचा फौजफाटा घेऊन प्रशासन आपला ताबा घेण्यासाठी आले आहे यावेळी उपस्थित रेल्वे प्रशासनाकडून एक्सेल सीनियर इंजिनियर समीर कुमार, रेल्वे प्रतिनिधी भूषण रघुवंशी, सर्कल स्वाती कोळी, तलाठी हर्षला सोनवणे, नरडाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र माने, यांच्यासह शेतकरी अनिल रमण पवार ईश्वर पाटील, दिनेश दिलीप पवार, प्रमोद दिलीप पवार व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शेवटी रेल्वे प्रशासनातील अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या मध्यस्थीने शिरपूर प्रांत शरद मंडलिक साहेबांसोबत मीटिंग करून यातून मार्ग काढू असे झाल्यानंतर संपूर्ण ताफा हा परत रवाना झाला.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post