-->

धुळे दि.१९ (गोकुळ देवरे ) - भारतीय संविधानाने या देशाच्या एकतेला बळ देण्याचे काम केले आहे. संविधानकर्त्यांनी या धर्मनिरपेक्ष देशाला एक प्रकारे संविधानाच्या माध्यमातून एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक समुदायाच्या जनतेला आणि पत्रकारांना या सामाजिक एकतेसाठी काम करावे लागणार आहे, अशी अपेक्षा आज मान्यवरांनी ईद मिलन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम तसेच मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या सत्कार या संयुक्त समारंभात व्यक्त केले. धुळे शहरातील वीर सावरकर मार्गावरील आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या लगत असणाऱ्या सभागृहात साप्ताहिक जनसंग्राम यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार तवाब अन्सारी यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे हे होते .तर यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे,सचिव डी बी पाटील, कोषाध्यक्ष सुवर्णा टेंभेकर, संचालक मनोज बैसाने,कैलास गर्दे,शेख अजीम,शोभा आखाडे, सुनील निकम,गोकुळ देवरे,जितेंद्र राजपूत,जॉनी पवार,सोपान देसले ,दत्ता बागुल,माजी अध्यक्ष हेमंत मदाने व विशाल ठाकूर,सदस्य मोनिका शिंपी,रेहान शेख, यांच्यासह मरकज मशिदीचे ट्रस्टी हाजी शौकतभाई,हाजी अखिल शेख,सेवानिवृत्त नायब तहसीलदार हाजी अब्दुल रहमान, सेवानिवृत्त प्राचार्य हाजी हवीब, यंग बॉईज संस्थेचे अध्यक्ष हाजी रफिक राव,धुळे जिल्हा जमीयतचे उपाध्यक्ष हाजी गुफ्रान सेठ पोपटवाले,खिदमतुल संस्थेचे सदस्य गोपाल अन्सारी,प्राचार्य शमशुल हसन व इमरान खान यांच्यासह असंख्य पत्रकार आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना पत्रकार तवाब अन्सारी यांनी धुळे जिल्ह्याला असणारी सामाजिक एकतेची परंपरा आणि त्यासाठी पत्रकारांनी दिलेले योगदान याविषयीची माहिती दिली.तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे यांनी धुळे शहर हे दंगलींमुळे बदनाम झालेले असले तरीही या शहरातील धर्मनिरपेक्ष शक्तींनी सामाजिक एकता टिकवून ठेवली आहे. यात पत्रकारांचे मोठे योगदानअसल्याचे विशद केले .तर विशाल ठाकूर यांनी देखील पत्रकारांच्या कार्याचा उजाळा घेत असतानाच धुळे जिल्ह्याची स्थिती विशद केली. अध्यक्षीय मार्गदर्शनात योगेंद्र जुनागडे यांनी संविधान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असल्याचे सांगितले. या देशावर अनेक वेळेस संकट आले .मात्र त्यावेळी सर्व धर्माने एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी उभे राहिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सामाजिक एकता ही कधीही नष्ट होऊ शकत नाही. पण ही सामाजिक एकता टिकवण्यासाठी प्रत्येकाला सजग राहावे लागेल,असे त्यांनी सांगितले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post