-->

ग्रीन धुळे वृक्ष टीम च्या सुमारे ४००-५०० सदस्यांनी लळिंग कुरणात सुमारे २५ हजार बिजरोवणाचा यशस्वी उपक्रम राबविला. ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे लळींग किल्ला परिसरात सीडबॉल व बिजरोहण चा कार्यक्रम अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न. धुळे लळींग दि.०९ (गोकुळ देवरे) - दि.०९ जुन रविवारी सकाळी साडे‌ सहा वाजेपासून पर्यावरणा विषयी जागरूक धुळेकरांनी सीडबॉलद्वारे बीजरोवण केले. सुरुवातीला टीमचे तज्ञ मंडळी यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर सगळ्यांना सीडबॉल व बीज रोहन कसे करायचे हे समजावून सांगितले. त्यानंतर सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापले ग्रुप तयार केले.लळिंग किल्ल्याच्या समोरच्या टेकडीवर, किल्ल्यावर, घाट चढून गेल्यावर पोलीस चौकीच्या समोर, पुढे बीएसएनएल टॉवरच्या समोरचा परिसर तसेच कमानीचा परिसर म्हणजेच जवळपास दोनशे एकराच्या परिसरात ग्रीन धुळे वृक्ष टीमचे सुमारे चारशे‌ ते पाचशे सदस्यांनी पंचवीस हजार सीडबॉल व बिजरोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. यात पाईप व्दारे काटेरी झुडपात सीड बाॅल रोवण्यात आले. शहरातील अनेक मान्यवरव्यक्ती, डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर अकाउंटंट, विविध पक्षातील पदाधिकारी, व्यापारी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, तरुण-तरुणी,ज्येष्ठ नागरिक, महिला संघटना, अगदी लहान मुले सुद्धा या कार्यक्रमात उत्सपुर्त सहभागी नोंदवला. सगळ्या सदस्यांचा मोठा उत्साह पाहून धुळ्यात नक्की क्रांती घडेल असे म्हणायला काही हरकत नाही.पत्रकार बंधूंनी सुद्धा सकाळी येऊन.सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्या कॅमेरात कैद केल्या. कोणतेही व्यक्तीचे, संघटनेचे, पक्षाचे नाव विरहित असलेली ही धुळेकरांची एक चळवळ बनली आहे.येणाऱ्या काळात धुळे ग्रीन सिटी अभियान यशस्वी करून सदर अभियान संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाचे अभियान बनविण्याचा प्रयत्न ग्रीन धुळे वृक्षटिम बनविण्याचा संकल्प यावेळी उपस्थित सदस्यांनी केला.तसेच धुळेकरांचा सदर अभियानात वाढता प्रतिसाद हा खरोखर टिमच्या सदस्यांचा आत्मविश्वास वाढवित आहे.या अभियानास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वच धुळेकरांचे अभिनंदन ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सुमारे १९०० सदस्यांकडून करण्यात आले.तसेच सदर धुळेकरांसाठी महत्वपुर्ण असलेल्या अभियानात सहभाग नोंदविण्याचे आव्हान ग्रीन धुळे वृक्ष टीम कडून करण्यात आले आहे.या अगोदर दि.५. जुन रोजी प्रभात नगर येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शंभर वृक्ष रोपे लावण्यात आली असून ती रोपे‌ व गांडूळ खत माॅडर्न नर्सरीचे संचालक मा जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उत्तमराव पाटील यांनी धुळे ग्रीन सीटी अभियान करिता मोफत उपलब्ध करून दिले. आज दि.७ जून रोजी सीड बाॅल तयार करणे बाबत एक दिवसीय कार्यशाळा चांडक येथे फाॅर्मचे संचालक पर्यावरण तज्ज्ञ विजय चांडक यांनी मार्गदर्शन व जागा उपलब्ध करून दिली होती.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post