कापडणे गावातील युवा शेतकरी शेतीत काम करत असताना विजेचा धक्का लागून बैल जोडीसह शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कापडणे दि.१०(गोकुळ देवरे) - दिनांक १० जून रोजी कापडणे येथील युवा शेतकरी चंद्रकांत (लालू) मिठाराम माळी (४०) यांचे आज दि. १० सोमवार रोजी दुपारी बारा वाजता शेतात काम करीत असतांना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. लालू माळी हे दररोज कापडणे येथील शेतकऱ्यांचा शेत माल घेऊन शहादा येथील भाजीपाला मार्केटमध्ये जात होते. आज देखील ते शहादा येथून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे शेतात काम करायला गेले. यावेळी विजेच्या धक्क्याने दोन बैल व मनमिळावू स्वभावाचा लालू माळी हे यांचे शेतात काम करीत असतांना त्यांना विजेचा धक्का लागून बैल जोडीसह शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला
byloksahi.varta.news
-
0