जैताने येथील रोहिणी नदी च्या संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी करा..पुंडलिक बच्छाव यांची मागणी निजामपूर (परवेज सैय्यद) दि.१४ -जैताने येथील रोहिणी नदी च्या संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी करा अशी मागणी पुंडलिक बच्छाव यांनी केली आहे.सदर काम हे जैताने येथील रोहिणीनदी च्या संरक्षण भिंती चे आहे व जवळच भवानी मातेचे मंदिर देखील आहे.म्हणून काम चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी पुंडलिक बच्छाव यांनी या ठेकेदाराच्या मनमानी कारभार ची चौकशी ची मागणी खालील प्रमाणे अरोप करत तक्रार केली आहे.जैताने येथील ग्राम पंचायत सदस्य राजेश बागुल यांच्या पाठपुराव्या ने मंजूर झालेली रोहिणी नदी च्या संरक्षण भिंती चे काम निकृष्ठ दर्जाचे व सदर कामासाठी तापी ची रेती न वापरता परिसरातील बोगस रेती,खडी व सिमेंट देखील कमी दर्जाचे वापरले जात आहे व भिंत उभारण्यासाठी जे पिलर उभे केले जातात ते देखील केले नाही व भिंती च्या कामाला पाणी देखील कमी वापरले आहे असे आरोप जैताने येथील पुंडलिक बच्छाव यांनी केले आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी ची मागणी देखील केली तसेच जैताने येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश बागुल त्या संरक्षण भिंती च्या कामावरती टॅक्टर लावण्यासाठी 500 रुपये प्रमाणे कमिशन दया त्यालाच टॅक्टर लावू देईल असा आरोप जैताने येथील पुंडलिक बच्छाव यांनी केले आहे.सदर काम हे ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिर जवळ असून काम चांगल्या गुणवत्ते चा झाला पाहिजे असे गावातील नागरिकांची देखील मागणी आहे ठेखेदार हा लोकांची दिशाभूल करून मनमानी कारभार करत आहे असे आरोप देखील होत आहे या चौकशी ची पूर्ण पणे पाठपुरावा करणार असे सांगितले आहे.कामाची चौकशी होते किंवा नाही हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे...
byloksahi.varta.news
-
0