-->

कॉपर केबल चोरी करणारी टोळी २४ तासाच्या आत गजाआड निजामपूर पोलीसांचे एकशन मोड सुरुच निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२७ रोजी रात्री ०२.३० वाजेच्या सुमारास निजामपुर पोलीस स्टेशनहद्दीतील सालटेक गाव शिवारातील गेल सोलर कंपनीच्या कंपाऊंड मधील ब्लॉक क्रमांक ४८ मधील ६९,०००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली होती त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१५/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दि.२७/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचाअसल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे ०१. देविदास बंडु थोरात, रा. रायपुर ता. साक्रीजि.धुळे, २) देविदास वेडु वाघमोडे, ३) रविंद्र धवळु कारंडे, ४) ज्ञानेश्वर दामु कारंडे, ५) बापु लहानु कारंडे सर्व रा. धमनार ता. साक्री जि.धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्याआत ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हाकरतांना वापरलेली मोटार सायकल तसेच लोखंडी कटर असे एकुण १,०९,०००/- रुपयेकिंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. किशोर काळे,अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि / श्री मयुर भामरे, पोउनि / प्रदिप सोनवणे, पोउनि / यशवंत भामरे, पोउनि / मधुकर सोमासे, पोहेकॉ / ४१०रतन मोरे, पोहेकॉ/१३६१ प्रदिप आखाडे, पोना / १९९ खंडेराव पवार, पोकॉ/ १४९५ परमेश्वरचव्हाण, पोकॉ/३९४ प्रविण पवार, पोकॉ / ११८८ श्रीराम पदमर, पोकॉ/६५१ फुलसिंगवसावे,पोकॉ/१२५३ पृथ्वीराज शिंदे, चापोसई / अमरसिंग पवार यांचे पथकाने केली आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post