-->

धुळे दि.१९ - नगांव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा महाराजांच्या स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यामुळे शिवजयंती निमीत्त त्यांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरावा यासाठी महात्मा फुले व बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती साजरी करण्यात सुरवात केली ती आजतागायात अखंड सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक हिंदु बंधु-भगिणींमध्ये जणू काही नवचैतन्य येते असे प्रत्येकाला वाटते असे मत आज नगांव येथे शिवजयंती निमीत्त कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच सौ.ज्ञानज्योतीमाई भदाणे यांनी व्यक्त केले. आज नगांव येेथे शिवजयंती निमीत्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर सौ.ज्ञानज्योती भदाणे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे पुजा अर्चा करुन पुष्पाहार अर्पण करुण शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला, तसेच जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव च्या घोषणा देत परिसर शिवप्रेमींनी दणाणून सोडला होता. यावेळी शिवाजी महाराजांच्या कार्याचा उजाळा सौ.ज्ञानज्योतीमाई भदाणे यांनी यावेळी दिला. यावेळी पुढे बोलतांना म्हणाले की, त्यांचे केलेले कार्य नवतरुण असो की, वयोवृद्ध यांना प्रेरणा देणारे कार्य आहे. म्हणून आजही शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेतले की, मनात नवचैतन्य निर्माण होते. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुरुवातीला अवघ्या काही मावळ्यांच्या साथ होती. कमी मनुष्यबळातही बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांनी गनिमी कावा या युद्धनितीचा वापर केला. हळूहळू आपले आरमार वाढवले. सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. अशाप्रकारे यावेळी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला. आज शिवजयंती निमीत्त आयोजीत कार्यक्रमात जेष्ठ ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post