धुळे शहरात विनापरवाना गुंगीकारक औषधी नशा येण्यासाठी अवैध विक्री करणाऱ्या गुन्हेगार या मुद्देमाला जेरबंद आझाद नगर पोलीस स्टेशनची कारवाई धुळे दि. २४ - धुळे शहरातील पारोळा रोड चौफुली सचिन एस मुंबई आग्रा महामार्ग क्र. ३ शिरपूर कडून धुळे कडे येणाऱ्या रोड लगत मुंबई पंजाब ढाब्याचे उत्तरेस असलेले कृषी महाविद्यालयाच्या पडीत शेतात काटेरी झुडपात इसम नामे शकील सलीम शेख उर्फ शकील सेंधवा वय ४१ , राहणार वडजाई रोड , कब्रस्तान जवळ , ईस्लामिक डे - स्कूल धुळे हा गुंगीकारक औषधी साठा कब्जात बाळगूण विनापरवाना त्याची चोरटी विक्री करीत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून सायंकाळी १९.१५ वा. छापा टाकला असता आरोपी शकील सलीम शेख याचे कब्जातील एका कापडी पिशवीत ४७२५/- रुपये कि.च्या. १०० मिलीच्या एकूण २७ औषधी बॉटल Rexstar-CD या नावाच्या Arcon Pharmaceuticals या कंपनीचे लेबल असलेला औषधी साठा मिळून आला आहे नमूद आरोपीकडे औषधी साठा खरेदी असल्याचे बिल तसेच विक्री करण्याचा कोणताही परवाना अगर वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान अगर पदवी नसताना अथवा कोणत्याही डॉक्टरांनी लिहून दिलेली पिसस्क्रिप्शन शिवाय स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गैर कायदेशीर मार्गाने चोरटी विक्री करण्याचे आदेशाने रंगेहाथ मिळून आला म्हणून सदर इसमा विरुद्ध एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क) २२ सह भादवी कलम ३२८, २७६ औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कलम १८(c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपीतास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोसई समाधान सुरवाडे हे करीत आहेत सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे , सहा पोलीस अधीक्षक श्री. एस. ऋषिकेश रेड्डी यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे आझाद नगर पो. स्टे.चे श्री. बाळासाहेब थोरात पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकातील पोहेकॉ/योगेश शिरसाठ , प्रकाश माळी , मुक्तार मन्सूरी , पंकज जोंधळे , गौतम सपकाळे , सिद्धार्थ मोरे , मकसूद पठाण , शाकिब शेख , प्रशांत पाटील यांनी सदरची कारवाई केली.
byloksahi.varta.news
-
0