-->

नगांव दि.२५ - नगांव पुण्यभूमीच्या तीन भूमिपुत्रांची देश सेवेसाठी आर्मी भरती निवळ गेल्या अनेक वर्षापासून भरती प्रक्रियेत संघर्ष करीत असणारे अतिशय गरिबीतील परिस्थितीतील विद्यार्थ्यांना आज यश प्राप्त झाले त्यात चि. कल्पेश बारकू पाटील नगांव या विद्यार्थ्याचे लहानपणीच वडिलांचे निधन झाले़ त्याच्या घरची परिस्थिती अत्यत हालाखिची असल्याने कुटूबांची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती तसेच एकीकडे शिक्षणही अत्यावश्यक असताना मेहनत करून शिक्षण घेतले़ दोन्ही जबादारी या मुलावर अवलंबून होते ती जबाबदारी सांभाळीत तसेच भरती प्रक्रियेत अनेक भरतीमध्ये प्रयत्न करीत आज त्याच्या नेहमीतिला यश प्राप्त झाले तसेच दुसरा विद्यार्थी निलेश राजेंद्र पाटील नगांव आणि तिसरा विद्यार्थी हेमंत भागवत पाटील नगांव या तिघी नगांव पुण्यभूमीतील भूमिपुत्रांची भारतीय देश सेवेसाठी आर्मी भरती निवळ झाल्याच्या आनंदात संपूर्ण नगांव गावाने या मुलांचे कौतुक केले गावात एकच चर्चा परसली तसेच या तिघे विद्यार्थ्यांचा नगांव गावात सत्कार करून कौतुक करण्यात आले तसेच मित्र परिवाराकडून या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post