धुळे - दि.१५. (गोकुळ देवरे) - सर्व पक्षांतील नेते जर, खरोखरच भाजप विरोधी एकच उमेदवार देणार असतील तर मुस्लिम दलित व आदिवासी बांधवांनी सदर संकल्पनेचा विचार करावा. मुस्लिम समाजातील विचारवंताचे व काही नेत्यांचे आव्हान.! 'भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्याविरुद्ध भाजपा विरोधी सर्व राजकीय पक्ष मिळून एकच उमेदवार देण्याचा गांभीर्याने निर्णय घेत असतील तर घटना बदल्याचा हुकूमशाही आणण्याचा विचार करण्याचे कारस्थान करीत असलेल्या जातीयवादी भाजपा विरूद्ध आपल्या मुस्लिम बांधवांनी सदर संकल्पनेचा स्विकार करण्याचा विचार करावा.'असे पत्रक मुस्लिम समाजातील विचारवंत श्री अकबर अली सय्यदसर,सलिम शेख (लंबू) रफिक भाई पंपवाले,आसिफभाई टायरवाले,शरीफ मामू,दिलावर पठाण,भैय्यासेठ,पप्पू भाई ,के.एम.पठाण,शकीलभाई ,अलताफ शेख,आबीद मनियार ,जाकीर खाटीक,खलीलअन्सारी,जावीदभाई किराणावाले,इ.प्रसिध्दी दिले आहे. भाजपा राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम,दलित, आदिवासी इ.समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आहे.यामुळे दहशतीखाली जीव मुठीत धरून उपेक्षित समाज बांधव जीवन कंठित आहेत.समाजातील अशा असुरक्षित वातावरणातून मुक्तता करून घेण्याकरिता समान नागरी कायदा आणणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतील आरक्षण संपुष्टात आणणे होय.आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र येणे आवश्यक आहे.देशाची घटना बदलण्यासाठी भाजपला चारशे पाच लोकसभा सदस्यांची आवश्यकता आहे.भाजपाच्या जाहिरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे धोरण जाहीरच केले आहे.हे आता लपून राहिलेले नाही.भाजपाचे खासदार आजच जाहीर सभातून घटना बदल्याचा वल्गना करीत आहेत.आपल्या देशाची घटना बदलून रशिया सदृश्य घटना लागू करण्याचे कुटील कारस्थान सूरू असल्याचे कालच खासदार संजय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दुर्दैवाने आपण असेच गाफिल राहिलो तर आपला मतदानाचा हक्क सुध्दा धोक्यात येवू शकतो रशिया मध्ये पुतीन यांनी आजन्म सर्वोच्च पदावर राहण्याचा घटनेत बदल करून घेतला.तसाच बदल पुतीन यांचे मित्र नरेंद्र मोदी आमुलाग्र बदल डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेत करण्याचा भाजपाचा मानस स्पष्ट दिसून येतो.उच्चवर्णीय लोकांचा भाजपा पक्षाने कधीही डॉ. बाबासाहेब त्यांच्या विचारसरणीत स्थान दिलेले नाही आजपर्यंत संघाने कधीही डॉ.बाबासाहेबांचा फोटो सुध्दा आपल्या कार्यालयात लावला नाही.एवढेच नव्हे तर,डॉ.बाबासाहेबांची जयंती चौदा एप्रिल अथवा महापरिनिर्वाण दिन दिवस सहा डिसेंबर साजरा केला नाही.सरदार वल्लभभाई पटेल यांचा दोनशे पन्नास फुट उंचीचा पुतळा साडेतीन हजार कोटी रूपये खर्ची टाकून अठरा महिन्यात ऊभा केला.पण बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यास मदत केली नाही.डाॅ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदु मिलची जागा श्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री व डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना दिलेली आहे.भाजपाचे योगदान शुन्य आहे.केंद्रात दहा वर्षे व महाराष्ट्रात पाच वर्ष सरकार असतांना सुध्दा घटनेचेच शिल्पकार,भारतरत्न,महामानव, डॉ.बाबासाहेबांचे स्मारक स्मारक उभे करू शकले नाहीत.दलित व उपेक्षित समाजावरील भाजपाचे हे प्रेम सावत्र आईचे आहे. मणिपूर मध्ये आदिवासी महिलांची नग्नधिंड काढली.पोलिस रोज गोळया घालून आदिवासींचे बळी घेत आहे.गेल्या चौदा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा गृहमंत्री अमित शहा एकदाही मणिपूर मधिल आदिवासींना आधार देण्याकरिता गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या समाजाने घटनेच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी.भाजपा आपल्या मतांमध्ये दुफळी होवून त्यांचा उमेदवार निवडून यावा यासाठी मुस्लिम समाजातील उमेदवारास ऊभे करून मतांचे विभाजन करण्याचा कुटील डाव यशस्वी करून घेत आहे.भाजपाचा पराभव करण्यासाठी कंबर कसावी असे आवाहन वरील मुस्लिम बांधवांनी केले आहे.
byloksahi.varta.news
-
0