समाजाच्या आर्थिक विकासात पतसंस्थांचे विशेष महत्त्व - लक्ष्मीकांत शहा धुळे दि. ३० (परवेज सय्यद) - भारतीय आर्थिक व्यवस्थेत व महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक बदलात पतसंस्थांचे विशेष योगदान आहे.पतसंस्थांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागातील गोरगरीब, मध्यमवर्गीय समाजातील नागरिकांचा आर्थिक विकास साधण्यात पतसंस्थांची भूमीका महत्त्वाची आहे.यासाठी पतसंस्थांना शासनाने व सहकार विभागाने विशेष सहकार्य करून पतसंस्थांच्या विकासात सहकार्य करावे. असे आवाहन धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांतभाई शहा यांनी केले शिरपूर शहरात जिल्हा पतसंस्था फेडरेशन व शिरपूर तालुका पतसंस्थातर्फे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यासाठी पतसंस्थांच्या अडचणी व थकीत कर्ज वसुली या विषयावर कार्यशाळा घेतली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तुषार रंधे यांनी मार्गदर्शन करतांना जिल्हा फेडरेशन व पतसंस्थांनी समाजाचा आर्थिक साक्षरतेचा प्रचार प्रसार करून आर्थिक साक्षरतेतून प्रगत समाजाची उभारणी साठी योगदान द्यावे असे सुचविले. पतसंस्था फेडरेशनचे गटनेते गोपाळराव केले अध्यक्ष होते.उपाध्यक्ष देविदास पाटील सचिव रवींद्र वाणी कार्यकारी संचालक बी टी देवरे संचालक डॉ.दरबारसिंग गिरासे, सुरेश जैन, शरद पाचपुते, योगिता शहा, वृक्षाली चिंचोले, जगदीश सूर्यवंशी, कैलास गोगड, सती देवी पतपेढीचे चेअरमन साहेबराव पाटील, शिरपूर मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष कैलास अग्रवाल, महावीर पतसंस्थाच्या अध्यक्षा निर्मलाबाई जैन,डॉ. भास्कर पाटील, धर्मेश जैन ,आदी उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा यांनी पतसंस्थांनी विविध अडचणींवर मार्गदर्शन केले सहकार विभागाने अंशदान योजना लागू केली आहे. ती चुकीचा योजना आहे. त्यात जिल्ह्यातील पतसंस्थांनी निधी जमा करू नये असे आवाहन त्यांनी केले. संस्थांच्या उत्कर्षात कर्मचाऱ्यांचे योगदान या विषयावर प्रमुख वक्ते रवींद्र वाणी यांनी पतसंस्थांचे अध्यक्ष संचालक सभासद यांच्यातील प्रमुख धुवा म्हणजे कर्मचारी होय. कर्मचारी हा पतसंस्थेचा प्रमुख घटक आहे. त्यांनी सूत्रबद्ध नियोजन करून पतसंस्थेच्या हिताबरोबर स्वतःचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कर्मचाऱ्यांची भूमिका, जबाबदारी व्यवस्थापनाच्या अपेक्षा व पतसंस्थेचे उद्दिष्ट साधण्यासाठी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांनी नियमित कार्य पार पाडून सभासदांमध्ये जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध प्रस्थापित करून पतसंस्थेचा उत्कर्ष साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पतसंस्थांच्या ग्राहकांमध्ये आत्मविश्वास आणि निष्ठा यांचे वातावरण निर्माण करण्यात कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. असे मत वाणी यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळराव केले यांनी सहकारातून आपल्या सभासदांचा व समाजाचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी प्रयत्न करावा. पतसंस्थांच्या विकासात कर्मचारी व संचालकांनी योग्य समन्वय ठेवावा अशी भूमिका त्यांनी मांडली.यावेळी जिल्हा फेडरेशनचे नवनिर्वाचित संचालकांचा सतीदेवी व महावीर पतपेढी तर्फे हृदय सत्कार करण्यात आला. मोहन गुजराथी अग्रेसन पतपेढी, सुभाषचंद दुधोडीया महावीर पतपेढी शिरपूर यांनी परिसंवाद व चर्चासत्रात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचे स्वागत डॉ. भास्कर पाटील यांनी केले .धर्मेश जैन यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बडगुजर, भरसिंग राजपूत व सतीदेवी पतसंस्था बोराडी , महावीर पतसंस्था शिरपूरच्या संचालक , कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतलेत .
byloksahi.varta.news
-
0