विकसीत भारताचे व्हीजन भाजपाकडे डॉ.सुभाष भामरे प्रचंड मतांनी निवडणार - राघवेंद्र (राम) भदाणे धुळे दि. ४ - महायुती भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांचा प्रचाराचा दुसरा टप्पा सुरु झाला असून प्रचारादरम्यान मतदारांचाप्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खा.डॉ.सुभाष भामरे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे हा प्रतिसाददिसत असल्याचे मत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांनीप्रचारा दरम्यान व्यक्त केले. आज दि.4 मे रोजी प्रचार रॅली व कॉर्नर सभांचे कुसुंबा, उडाणे, गोताणे, कुंडाणे या गावांत आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उमेदवार खा.डॉ.सुभाष भामरे, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, सरचिटणीसबाळासाहेब भदाणे, जि.प.सदस्य संग्राम पाटील, बापू खलाणे, आशुतोष पाटील, अनिकेत विजय पाटील, तालुकाप्रमुख रितेश परदेशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे म्हणालेत, भाजपा पक्षाने डोळ्यासमोर विकसीत भारताचे व्हीजन ठेवले असून या दहा वर्षाच्या मोदीजींच्या काळात भारताचाझालेला विकास पाहून सर्व तरुण, महिला, जेष्ठमतदारांनी मनाशी खुनगाठ बांधली आहे. आता पुन्हा एकदा मोदी सरकारबसणार असल्याचे चित्र आज सर्वदूर दिसत आहे. म्हणून मोदींना पुन्हाएकदा प्रधानमंत्री पदी विराजमान करण्यासाठी व त्यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी १० वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती मतदरांना दिली या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, सरचिटणीसबाळासाहेब भदाणे, जि.प.सदस्य संग्राम पाटील, बापू खलाणे, आशितोष पाटील, अनिकेत विजय पाटील, तालुकाप्रमुख रितेश परदेशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कुसुंबा पंचक्रोषीतसर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0