-->

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त महामानवाची रांगोळी काढून मानवंदना करण्यात आली धुळे / नगांव दि.१४ - शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमीत्त धुळे येथे बस स्टँडजवळ जेल रोड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रांगोळी काढण्यात आलेली होती सदर रांगोळी ही सर्व नागरीकांचे आकर्षन ठरली होती. या ठिकाणी माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगांव येथील पंचशील स्तंभ येथे माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन सामुहीक अभिवादन करण्यात आले. तसेच आण्णासाहेब द.वा.पाटील शैक्षणिक संकुलातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात यावेळी नगांव एज्युकेशन सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे संचलित शाखांचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिणी व ग्रामस्थांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगांव येथील पंचशील स्तंभाजवळ उपस्थितांसमोर माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नुसती व्यक्ती नसून दैवीरुप होते त्यांच्यामुळे आज भारत देश त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या आधारवर उभा आहे. त्यांनी केलेले समाजकार्य हे सर्व समाज बांधवांसाठी गर्वाची गोष्ट आहे. त्यांचे थोर विचार आपण सर्वांनी आत्मसात केले पाहिजे त्यांचे. त्यांनी अतिसामान्यापासून श्रीमतांपर्यंत सर्वांसाठी केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. म्हणून आज नुसते भारतात नव्हे तर संपुर्ण जगातील कानाकोपऱ्यात डॉ.बाबासाहेबांचे नांव आजही अमर आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या समाजाला दिलेली शिकवण म्हणजे शिका आणि संघटीत व्हा हा मुलमंत्र प्रत्येकांपर्यंत पोहचविण्याचे अनमोल कार्य देखिल आपण केले पाहिजे. अतिसामान्य कुटुंबात जन्म घेऊन डॉ.बाबासाहेबांनी उच्चविभूशीत पदवी प्रदान करुन भारत देशाला सर्वात मोठी राज्यघटना दिली अशा महामानवांनी दिलेली शिकवन म्हणजे शिक्षण हे समाजातील अतिसामान्यांना कसे देता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तेच खरे बाबासाहेबांना अभिप्रेत ठरेल असे यावेळी माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले. याप्रसंगी नगांव येथील ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post