-->

धुळे/न्याहळोद दि. १३ (गोकुळ देवरे) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त न्याहळोद येथे १२० गरजू महिलांना साड्या वाटप.... मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संचालीका शोभाताई आखाडे व तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान बापू बाविस्कर यांचा स्तुत्य उपक्रम.... धुळे - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त न्याहळोद येथे १२० गरजू महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. सामाजिक कार्य करत असताना समाजाचं देणं लागतो या उदात्त भावनेने व सामाजिक बांधिलकीतून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संचालक व‌सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई आखाडे व तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान बापू बाविस्कर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी हे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केले आहे. महापुरुषांची जयंती सामाजिक बांधिलकीतून साजरी करण्याचा मानस शोभाताई आखाडे यांनी व्यक्त केला होता. त्याच माध्यमातून त्यांनी न्याहळोद येथील १२० गरजू महिलांना साड्यांचे वाटप करून नवीन उपक्रमाने जयंती साजरी केली आहे.यावेळी उपस्थित महिलांनी देखील त्यांच्या या उपक्रमाच तोंड भरून कौतुक केल आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी,मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे , माजी अध्यक्ष हेमंत मदाने , डि बी पाटील , प्रकाश चव्हाण , गोकुळ देवरे , सोपान देसले , विशाल ठाकूर , शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे , गौतम पगारे , बापू बागुल , अँड. विशाल साळवे , न्याहळोदच्या सरपंच कविता वाघ , कुवर , संतोष कढरे , बापू कढरे , कविता माळी , जयवंत माळी , ज्ञानेश्वर रोकडे , राम माळी , सुनिल पुराणिक , राकेश पवार , अल्ताफ खाटीक , हनीफ खाटीक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post