सोनगिर दि. २९ - धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन.जी.बागूल हायस्कूलच्या वादात निष्पाप शिक्षकांचा बळी जात असणे बाबत निवेदन सहाय्यक पोलीसऊपनिरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले यांना निवेदन देत सोनगीरचे ग्रामस्थ व पत्रकार यांनी सोनगीर विद्याप्रसारक संस्थेच्या एन.जी.बागूल हायस्कूलमध्ये गेल्या ४० वर्षांपासून संस्थाचालकांमध्ये अध्यक्षपदासाठी दोन गटात वाद सुरू आहे. दोन्ही गट एकमेकांवर खोट्या केसेस दाखल करीत असतात.त्यामुळे त्यात निष्पाप शिक्षकांचा नाहक बळी जातो. सोनगीर पोलीस ठाण्यात खोटी कागदपत्रे दाखवून एक ते दीड कोटीची शासनाची फसवणूक अशी एफआयआर १२ एप्रिल रोजी दाखल झाली.त्यात सोनगीर रत्न पुरस्कार प्राप्त निवृत्त शिक्षक तथा सोनगीर पत्रकार संघाचे अध्यक्ष लोटन भटू चौधरी यांचा ही समावेश आहे.स्वत: फिर्याददार मुख्याध्यापकांची चार शिक्षक,एक लिपिक व एक शिपाई यांच्याविरुद्ध फिर्याद देण्याची इच्छा नव्हती.पण त्यांच्यावर दबाव होता असे कळते.याप्रकरणी तत्कालीन शिक्षण अधिकारीची भुमिकाही संशयास्पद आहे.त्यांनी संशयित शिक्षकांची बाजू ऐकून न घेताच त्यांना गुन्हेगार ठरवले.विशेष म्हणजे मुख्याध्यापक यांची तक्रार हाच चौकशी अहवाल म्हणून शिक्षणाधिकारींनी पोलीसांकडे पाठवला.त्यात अक्षरही बदल केला नाही.यावरून शिक्षणाधिकारी संदिग्ध भुमिका स्पष्ट होते.न्यायालयाच्या निकालाने सर्व शिक्षकांना शिक्षण खात्यात गटशिक्षणाधिकारी असलेल्या प्रशासकाने कामावर हजर रहाण्याचा आदेश दिला. तसेच वेगवेगळ्या शिक्षणाधिकारींनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या शिक्षकांना मान्यता देत पगार मंजूर केला. तसेच वेगवेगळ्या लेखाधिकारींनी पगार निश्चित केला.हे सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारींनी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून कार्यवाही केली.हे सर्व अधिकारी खोटी कागदपत्रांच्या आधारे कामकाज करतील का? तर असे शक्य वाटत नाही.१९९३ पासून शिक्षक म्हणून नोकरी करणार्या लोटन चौधरी यांना २००२ मध्ये कामावर घेऊन पगार देण्याचे आदेश असतानाही संस्थेने२००८ या वर्षी पगाराचा प्रस्ताव पाठवून सहा वर्षे बिनपगारी राबवून घेत अन्याय केला. त्यामुळे अवघ्या १४वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले.त्यामुळे पीएफ व ग्रॅज्युएटी खूपच कमी मिळाली.विशेष म्हणजे शिक्षकांचा पेन्शन प्रस्ताव मंजूर करताना अनेक टप्प्यावर कागदपत्रांची तपासणी करून खातरजमा केली जाते.तो प्रस्ताव मुख्याध्यापक पाठवतात.प्रत्येक पेन्शन प्रस्ताव वेगवेगळे मुख्याध्यापक व वेगवेगळ्या शिक्षणाधिकारींनी मंजूर केले आहे.या सर्वानी कामात कसूर केली असे फिर्यादी मुख्याध्यापकांना म्हणायचे आहे का? त्यामुळे संपूर्ण नोकरीत व पेंशन प्रस्ताव मंजुरी शिक्षकांचा कुठेही व काहीही संबंध येत नाही. त्यांना किती पेन्शन व ग्रॅज्युएटी द्यावी हा अधिकार वरिष्ठांचा असून त्यात शिक्षकांना ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे संबंधित एफआयआरमधून पत्रकार व शिक्षक लोटन चौधरी व इतर शिक्षकांना दिलासा द्यावा. चौकशीअंती अधिक रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास तेवढी रक्कम भरण्यास संशयित तयार आहेत.त्यामुळे कोणत्याही शिक्षकांना अटक करू नये ही नम्र विनंती.लवकरच ग्रामस्थांची एक बैठक घेऊन संस्थेतील हा वाद कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत.असेही म्हटले आहे.
byloksahi.varta.news
-
0