-->

निजामपूर येथील अंगलो उर्दू हायस्कूल इयत्ता दहावीचा निकाल ८३.३३% लागला निजामपूर दि.२८ (परवेज सैय्यद) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result) आज जाहीर करण्यात आला आहे. त्यात राज्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. यातून धुळे जिल्हा येथील साक्री तालुक्यातील निजामपूर गावातील ऐगलो उर्दू हायस्कूल चा निकाल दहावी चा निकाल ८३.३३ टक्के लागला आहे. त्यात निजामपूर येथील भारत ऑटो पार्टस चे मालक साजिद पठाण यांची मुलगी प्रथम येऊन इफत साजिद पठाण ने ९०.०० टक्के गुण मिळवले द्वितीय क्रमांक वरती ,मसीरा जाहिरबेग मिर्झा हिने ८७.२० टक्के मिळवले ,व तृतीय क्रमांक वरती अरशिया अल्ताफ बेग मिर्झा हिने ८६. ०० टक्के गुण मिळवले आहे अशा प्रकारे शाळेचा ८३.३३ टक्के निकाल लागला आहे. प्रथम आलेली व दहावीत चांगले गुण मिळवून पास झालेल्या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिचा गावातून व संस्थेचे अध्यक्ष -हाजी मिया बेग,उपाध्यक्ष लियाकत सय्यद,चेअरमन सलीम पठाण,सचिव शाबोद्दीन शेख,संचालक साबीर शेख,शाबीर खान पठान, व शिक्षक इतर कर्मचारी कडून कौतुक करण्यात येत आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post