वृक्षारोपण - काळाची गरज आहे पर्यावरण वाचवण्याचा संकल्प नगांव गावातील युवकांच्या हातून वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न नगांव दि. ०८ - निसर्गमित्र वृक्षारोपण - काळाची गरज आहे पर्यावरण वाचवण्याचा संकल्प नगांव गावातील युवकांनी पंचशिल स्तंभ लगत असलेल्या गोंदूर रस्त्यालगत आजू-बाजूस अनेक वृक्षरोपण व वेगवेगळ्या प्रकारची वृक्षरोपण रोपे(झाडे) लावुन वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास उपस्थित नगांव गावातील युवक वृक्षमित्र अभिषेक चंद्रा सर , अँड संतोष केदार , पोलिस विशाल सोनवणे , पै. रविद्र नेरकर , भाऊसाहेब (पारले) बैसाणे , पेंन्टर अमोल बैसाणे , अँड. संदिप बैसाणे , सिध्दार्थ बैसाणे सर आदी. मित्र परिवार उपस्थित होते. वृक्षारोपण हि लागवळ करणे हि काळाची गरज आहे प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वृक्ष केवळ आपले जीवनच प्रभावित करतात असे नव्हे तर ते आपले अस्तित्व सुराक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्षांपासून आपणास इंधन, इमारती लाकूड, सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्षांपासून आपणास रंधन, इमारती लाकूड, चारा, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी प्राप्त होते. भूमी आणि जल संरक्षणाचे काम वृक्ष करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनींची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. जमीनीचा ओलसर - पणा टिकवून ठेवण्यासाठी वृक्षांचा उपयोग होती.हिमालयाच्या पर्वतीय भागात देवदार, बांबू. साल, साग इत्यादी वृक्ष अढळतात. अशा वृक्षापासून आपल्याला इमारती, जहाजे इ. साठी लाकूड मिळते. तसेच निसर्गाचा समतोल देखील राखला जातो. औषधे तयार करण्यासाठी वृक्षांची फळे,फुले, साल, पाने, मुळे. बीया या सर्वांचा उपयोग केला जातो. स्वादिष्ट फळे, सुगंधित फुले, वस्त्र, इंधन, घर बांधण्यासाठी आजही गरज भाजते मानव हा वृक्षांवर अवलंबून आहे. वृक्ष व पशु पक्षी हे परस्पर पर्यायी आहेत जिथे वृक्षांची हिरवी गार वनराई असते तेथेच पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पक्षी वृक्षांवर घरटे बनवतात. वृक्ष आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्या - बरोबरच कार्बनडाय ऑक्साईड सारखे विषारी वायू शोषून घेऊन आपणास प्राण वायू देतात. दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या या वृक्षांमध्ये प्रदूषण कमी करण्याची अद्भुत क्षमता असते. वातावरण सुराक्षित, थंड, सुगंधित करण्यासाठी वृक्षांची सधनता उपयोगी ठरते. वृक्षांचे तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते. फुलझाडे, फळझाडे, सावली देणारे वृक्ष या सर्व प्रकारच्या वृक्षांचा एकच उद्देश आहे, मानवाचे कल्याण करणे. वृक्ष आपल्या सभोवतालचा परिसर सुंदर करतातच, पण वातावरणही सुगंधित करतात. अशामुळे शांती आणि आनंद वाटतो. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून आपल्याला सावली देतात वनांपासून आपल्याला डिंक, लाख, कागद, रबर या नित्योपयोगी वस्तू मिळतात. असे असूनही आज मानव रोज झाडे तोडत राहतो. पण तीच झाडे पुन्हा लावली जात नाही. हिरवीगार जंगले त्याने उजाड करून टाकली आणि त्यामुळे पर्यावरणाची भयंकर समस्या आपल्यासमोर उभी राहिली. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असणारे वृक्ष आपले जीवनदाते आहेत म्हणून आपण जुन्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष दरवर्षी लावले पाहिजेत. असे असूनही आज मानव रोज झाडे तोडत राहतो . त्यामुळे दुष्काळ, आणि वाळवंटीकरणासारख्या समस्या येऊ शकतील. यामुळे पर्यावरणाची भयंकर समस्या आपल्यासमोर उभी राहिली. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असणारे वृक्ष आपले जीवनदाते आहेत म्हणून आपण जुन्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष दरवर्षी लावले पाहिजेत. वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या संदर्भात आज नगांव गावातील युवकांनकडून पर्यावरण वाचवण्याचा संकल्प नगांव गावातील युवकांनी पंचशील स्तंभ लगत गोंदूर रस्त्यालगत आजू-बाजूस अनेक वृक्षरोपण वेगवेगळ्या प्रकारची वृक्षरोपण रोपे(झाडे) लागवड करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला ( लोकशाही वार्ता न्युज ऑनलाईन न्यूज पोर्टल संपादक - पै.दुयौधन पाटील )
byloksahi.varta.news
-
0