-->

निजामपूर ग्रामपालिकेच्या वतीने सदस्य प्रतिनिधी प्रकाश बच्छाव व रमेश कांबळे यांच्या प्रयत्नांना यश निजामपूर दि.०८(परवेज सैय्यद)- निजामपूर ग्रामपालिकेच्या वतीने सदस्य प्रतिनिधी प्रकाश बच्छाव व रमेश कांबळे यांच्या प्रयत्नांना यश पाणी समस्या साठी वॉर्ड क्र ५ मध्ये नवीन बोरवेल सुरू*निजामपूर -पाणीटंचाईमुळे अनेक गाव व्याकुळ असून, पाणीपातळी खोल गेल्याने उपायोजनाही फेल ठरत आहेत. साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात ही पाणीटंचाईचा झळा तीव्र झाल्याने दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा बारा दिवसांवर गेला आहे.तरी विशेष म्हणजे निजामपूर गावातील वार्ड क्रमांक ५ हा दलीत वस्तीने ओळखला जाणारा वार्ड आहे. या वार्डात प्रत्येक समाजाचे नागरिक राहतात व येथील नागरिकांचे घर स्वतःचे नसून घर भाड्याने घेऊन मोल मजुरी करून आपले उदर निर्वाह करतात. या पाणी टंचाईच्या काळात यांच्याकडे पाणीसाठा जपून ठेवण्यासाठी उपरोक्त साधने नसून रोजच्या रोज २४ तास पाणीपुरवठा स्टॅन्ड वरून पाणी भरून आपली गरज भागवतात आता तर २४ तास पाणी स्टॅन्ड ही ३ ते ४ दिवस वर येऊन गेले आहेत. अत्यंत पाणीटंचाईच्या समस्यांना बघत निजामपूर ग्रामपंचायतचे सदस्य पुष्पांजली बच्छाव यांचे प्रतिनिधी प्रकाश बच्छाव व निजामपूर ग्रामपालिकाचे सदस्य रमेश कांबळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून निजामपूर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रकाश बच्छाव व सदस्य रमेश कांबळे यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्ड क्रमांक ५ मध्ये नवीन बोरवेल ९०० फुट खोल करण्यात आली बोरवेल ला दोन ते अडीच इंचांनी पाणी प्रवाह लागला आहे. वार्ड क्रमांक ५ मध्ये पाणीपुरवठा हा पंधरा दिवसाच्या वर गेल्याने वार्डातील नागरिकांनी ३ जुन रोजी महिला पुरुष लहान बाळांसोबत पाणी टंचाईची तक्रार देण्यासाठी ग्रामपंचायतीत धडक मोर्चा ही काढला. यावेळेस ग्रामपंचायतीत निजामपुर ग्रामपालिकाचे ग्रामसेवक राहुल मोरे यांना वार्डातील पाणीटंचाईची समस्या नागरिकांकडून मांडण्यात आली समस्या अशी की वार्ड क्रमांक ५ मध्ये नवीन बोरवेल करण्यात आले होते त्यांला किमान दहा दिवसाचा कालावधी झाल्यानें पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार व या नवीन बोरवेल चे पाणी वार्ड क्रमांक ५ ला मिळावे अशा समस्या मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली मोर्चात बहु संख्येने महिला असून महिला संतप्त होऊन ग्रामसेवकांशी पाणीटंचाई समस्या संदर्भात तक्रारी सांगितल्या. तरी या समस्यांच्या अनुषंगाने ग्रामसेवक यांनी नागरिकांना तीन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल असे तोंडी आश्वासन दिले संतप्त नागरिकांनी ग्रामसेवक यांच्याशी तोंडी आश्वासनाला नाकार देऊन लेखी आश्वासन घेतले. लेखी आश्वासनात विद्यमान ग्रामसेवक श्री राहूल मोरे यांनी तीन दिवसाचे अंतराळात वार्ड क्रमांक ५ मध्ये कोणत्याही परिस्थितीत नवीन बोरवेल ची मोटर व स्वतंत्र पाईपलाईन, नवीन बोरवेल चा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल व फक्त आणि फक्त वार्ड क्रमांक ५ मध्येच नवीन बोरवेल चा पाणीपुरवठा देण्यात येईल अशी लेखी स्वरुपात ग्रामसेवक यांच्याकडून सांगण्यात आले तीन दिवसानंतर ग्रामसेवक यांच्या आश्वासन प्रमाणे ६ जूनला नवीन बोरवेल चा पाणीपुरवठा ही सोडण्यात आला वार्डातील पाणीटंचाईचा सामना करणारे नागरिकांमध्ये नवीन बोरवेलच्या पाणी सह समाधान दिसून आले निजामपूर ग्रामपालिकेचे माध्यमातून पाणी टंचाईची समस्या दूर झाल्याबद्दल निजामपूर वार्ड क्रमांक ५ मधील नागरिकांकडून ग्रामपालिकेचे विशेष आभार व कौतूक करण्यात आले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post