हॉटेल उदय काठियावाड जवळ खोदलेली चारी राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांना जीवघेणी. धुळे दि. १० (गोकुळ देवरे) - साक्री रोडवर मोराणे शिवारात राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल उदय काठियावाड लगत मुख्यरस्ता ते सर्विस रोड दरम्यान एक वर्षापासून चारी खोदून ठेवली आहे.ही चारी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असून दूचाकी, चारचाकीसह, अनेक मोठे वाहनांचे नुकसान झाले असून काही जणांना दूखापतीही झालेल्या आहेत. चारी जवळ दूभाजक, दिशादर्शक, विजेचे दिवे नाहीत त्यामुळे दूर पल्यावरची येणारी प्रवासी वाहने, अथवा शहरालगतचे दूचाकीस्वार जेव्हा जेवणासाठी चारी परिसरातील हॉटेलकडे वळतात त्यावेळी चारी दिसत नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे, काल दि.०९ जुन रोजी सायंकाळी आलेल्या मुसळधार पाऊसामुळे चारी पाण्याने तुडूंब भरली होती लक्षात न आल्यामुळे काही वाहन चारीत पडली. हॉटेल उदय काठियावाडचे मालक , नोकरवर्ग व परिसरातील नागरीक, वाटसरूंनी वाहनचालकांना चारीत अडकलेले वाहन बाहेर काढण्यासाठी मदत केली.भविष्यात मोठा अनर्थ घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत योग्य ती सुचना व उपाययोजना करावी अशी वाहनधारक व परिसरातून मागणी होत आहे.
byloksahi.varta.news
-
0