मोदी आवास योजनेचा निधी लवकर उपलब्ध करुन द्यावाजि.प.सदस्य राघवेंद्र(राम)भदाणे यांची ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजनांना विनंती धुळे दि.१३ : पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ओबीसी लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मोदी आवास योजनेंतर्गत धुळे तालुक्यासह महाराष्ट्रात घरकुल मंजूर झालेले आहेत, रु.१५ हजाराचा पहिला हप्ता लाभर्थ्यांच्या खात्यावर देखिल तीन महिन्यापूवीच पडला आहे. लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करण्यास देखिल सुरवात केलेली आहे. परंतू लोकसभा निवडणूकी पासून ते आजपावेतो मोदी आवास योजनेतील घरकुल लाभर्थ्यांचा पुढचा हप्ता आजपावेतो मिळालेला नाही त्यामुळे धुळे तालुक्यातील लाभार्थ्यांनी पुढील हप्ता मिळणेसाठी विनंती केलेली आहे, त्यामुळे जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे मोदी आवास योजनेचा निधी लाभर्थ्यांना लवकर करुन द्यावा अशी विनंती केलेली आहे. प्रधानमंत्री ना.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राच्या प्रभावी योजना सुरु आहे. त्यात सन २०२३ मध्ये मोदी साहेबांनी ओबीसी लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेची सुरुवात केली आहे. सदर योजनेमुळे वंचीत लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. धुळे तालुक्यातील अनेक ओबीसी लाभार्थ्यांची घरकुल देखिल मंजूर झाली आहेत. परंतू गेल्या तीन महिन्यापासून फक्त मोदी आवास घरकुल योजनेला निधी उपलब्ध झालेला नाही. इतर शबरी आवास, रमाई आवास व प्रधानमंत्री आवास घरकुल योजनांचा निधी उपलब्ध आहे. फक्त मोदी आवास घरकुल योजनेचा निधी उपलब्ध नसल्यामुळे लाभर्थ्यांची घरकुल बांधणे थांबलेले आहे. त्यामुळे नुकतीच जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांची भेट घेऊन मोदी आवास घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी केद्राकडे पत्रव्यवहार करावा अशी विनंती केलेली आहे. सदर विनंतीला ना.गिरीष महाजन यांनी सदर बाबतीत गांभीर्याने दखल घेतली असून लवकरात लवकर मोदी आवास घरकुल योजनेला निधी मिळेल असे आश्वासीत केले आहे. त्यामुळे मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावरच पुढील हप्ता लवकर पडणार असल्याची माहिती भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे यांनी दिली आहे.
byloksahi.varta.news
-
0