नगांव गोंदूर रोड व तसेच नगांव गोंदूर रोड परिसरात काही ठिकठिकाणी रस्त्यालगत रिकाम्या रिक्त जागी खड्डा खोदून रोप लागवड व सीड बॉल रोपण करण्यात आले आहे नगांव दि.११ - नगांव गोंदूर रोड व तसेच नगांव गोंदूर रोड परिसरात काही ठिकठिकाणी रस्त्यालगत रिकाम्या रिक्त जागी खड्डा खोदून रोप लागवड सीड बॉल रोपण करण्यात आले आहे नागाव गावातील डॉक्टर भुषण पाटील भदाणे यांनी नगाव गावात न गाव ग्रीन टीम तयार करून गावातील प्रत्येक गल्लीतील प्रत्येक घरातील एक एक नागरिक या नगाव ग्रीन टीम मध्ये सहभागी होऊन नगाव ग्रीन टीम ही मोठी टीम तयार होऊन नगाव गावात व तसेच लगाव गाव परिसरातील संपूर्ण परिसरात पर्यावरण दिवसापासून आज पर्यंत नगाव गावात नगाव ग्रीन टीमच्या वतीने गावातील संपूर्ण परिसरात रोप व सीडबॉल लागवड करून जी संकल्प मोहीम नगांव गावातील डॉक्टर भूषण पाटील (भदाणे) नगांव व त्यांच्या नगाव ग्रीन टीमने हाती घेतली असून ती सातत्याने यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास नगांव गावातील डॉक्टर भूषण पाटील (भदाणे) व्यक्त केला आहे ही संकल्पना केव्हा यशस्वी होईल जेव्हा गावातील संपूर्ण नागरिकांनी प्रतिसाद दिला तेव्हाच ही संकल्पना यशस्वी होईल तसेच लगाव तसेच परिसर हा निसर्ग रम्य पर्यावरण संतुलन आणि दुष्काळ ग्रस्त भाग होणार नाही याच पार्श्वभूमीवर गावात तसेच गाव परिसरात रोप लागवड व सीटबॉल मोहीम आणि हाती घेतले असून गावकऱ्यांनी आम्हाला सातत्याने सहकार्य करावे तसेच आज पावसाळा असून या पावसाळ्याच्या कालावधीत आम्ही व आमच्या टीमने जी रोप लागवड व सीडबॉल रोपण लागवड करून त्यास कुंपण म्हणून स्टील जाळी बसून दिले आहे तर कमीत कमी आपण उन्हाळ्यात त्या झाडाला पाणी घातले पाहिजे तसेच त्या झाडाचे निगराणी करून ते झाड वाढवले पाहिजे हीच जनतेला हात जोडून नम्र विनंती केली आहे. तसेच नगांव ग्रिन टीम च्या वतीने जेवढे जेवढे शक्य होईल तेवढे तेवढे त्या रोप लागवड व सिडबॉल रोपांच्या काळजी घेतली जाईल तसेच गावकऱ्यांनी देखील सातत्याने सहकार्य करावे तसेच नगाव ग्रीन टीमला हे इच्छुक मदत करत आहात त्यांचे डॉक्टर भूषण पाटील भदाणे व नगाव क्रीम टीमने आभार व्यक्त केले असून तसेच त्यांना मदत करता येईल अशांनी देखील मदत करावी. तसेच नगाव ग्रीन टीमला इच्छुक व्यक्ती रोप सिड बॉल बीज भेट देत आहेत तसेच कुंपण साठी स्टील जाळी उपलब्ध करून भेट देत आहे अशांचे देखील आभार व्यक्त केले आहे लवकरच नगाव ग्रीन टीम यशस्वीच्या गतीला असून येणाऱ्या काळात नगाव ग्रीन टीमला यश मिळेल त्याच संकल्पनेने नगाव ग्रीन टीम सातत्याने श्रमदान करीत आहेत तसेच प्रत्येक आठवड्यात त्यांनी जी रोप लागवड सीड बॉल बी रोपण लागवडीची मोहीम हाती घेतली असून ती फार अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांनी केलेले श्रमदान अतिशय महत्त्वाचे असून या रोप लागवड व सीट बोल रोपण मोहीम अंतर्गत गावातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छाने श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत तसेच श्रमदान लागणारे साहित्य कुदाई , टिकम , पावडी हे साहित्य स्वतः घरून आणून श्रमदानासाठी पुढे येत आहेत तसेच नगांव गावाचा रूप लागवड व सीट बॉल लागवडीच्या संदर्भात धुळे तालुक्यात नगांव ग्रीन टीमचा चौथा क्रमांक लागतो तसेच जिल्ह्याभरात अनेक गावांमध्ये असा उपक्रम राबवला जात असून परंतु जो जास्त प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे नगांव गावातील नगांव ग्रिन टीम ला मिळत आहे तसेच तालुक्यात बऱ्याचश्या गावांना फ पर्यावरण दिवसापुरता मदत तो कार्यक्रम राबवला जातो परंतु खऱ्या अर्थाने पावसाळ्यात जोपर्यंत पावसाचे पाणी मिळत असते तोपर्यंत रोप व सीड बॉल रोपण लागवड जेवढे शक्य होईल तेवढे रोप व सीड बॉल रोपण लागवडीचा प्रयत्न जनतेने केला गेला पाहिजे अशी संकल्पना जर प्रत्येक गावाने रोप लावून तसेच रोप व सीड बॉल रोपण लागवड करून गावात असा उपक्रम राबवला तर निश्चित भविष्यात येणाऱ्या काळात पर्यावरण समस्या निर्माण होणार नाही तसेच दुष्काळ देखील होणार नाही . खरंच नगांव ग्रीन टीमचे कौतुक करण्यात सारखेच असून पर्यावरण दिना पासून तर आज पर्यंत त्यांची रोप व सीड बॉल रोपण लागवड व श्रमदान करीत आहेत व जेवढा परिसर त्यांना रोप व सीड बॉल रोपण लागवड आणि श्रमदान करता येईल तेवढे श्रमदान करीत आहेत. 🌲मियावाकी फॉरेस्ट🌲 इन्स्टंट फॉरेस्ट ...झटापट जंगल निर्मितीसाठी ....मियावकि पद्धतिचा अवलंब आजकाल केला जातो. जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकि यांनी प्रथमतः वेगवेगळ्या प्रयोगानंतर या पद्धतीचा अवलंब करीत जपानमध्ये बरेच जंगल निर्माण केलीत. त्यांच्या नावानेच ही पद्धत पुढे प्रचलित झाली.जगात अनेक देशात अश्या पद्धतीचा अवलंब करीत झटपट जंगलांची निर्मिती केली जाते.ही पद्धत तशी खर्चिक आहे.चांगल्या जमिनीत त्याचे परिणाम छान असतात, परंतु डोंगराळ, हलक्या ,खडकाळ प्रदेशात मात्र त्याला खुप लिमिटेशन्स आहेत. ह्या पद्धतीत जमिनीची तयारी योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. जमीन भुसभुशीत करून, किंवा वरील काही थर काढून बाजूला करीत, चांगली माती भरावी लागते. त्या मातीत सेंद्रिय पदार्थ जसे, शेणखत, भाताचा भुसा, कोकोपीट, राख ,leafmould इ भरून माती अडीच ते तीन फूट भुसभुशीत कशी होईल ते बघावे. ह्या सर्व्या सेंद्रिय पदार्थामुळे जमीन अत्यंत सुपीक होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता अनेक पटीने वाढते. मुळ्या वाढीसाठी लागणारेरोपांच्या मुळ्या रुजायला , प्रशस्त वाढायला योग्य ती वातावरण निर्मिती तर होतेच, त्या बरोबर रोपांच्या वाढीसाठी उपयोगी जिवाणू अनंत पटीने वाढतात. ही सर्व तयारी झाल्यावर, योग्य वापासा असताना रोपं लावयास सुरुवात करावी. रोपांची व्यवस्था आधीच करून ठेवावी. रोपांमध्ये उंच वाढणारी, मध्यम वाढणारी, झुडूप वर्गीय व काही जमिनीवरच दोन तीन फुटांपर्यंत वाढणारी अशी विभागणी करावी. त्यांच्यात काही फळझाडे, जसे चेरी, बोर, सीताफळ, करवंद इ पण लाऊ शकता. त्यामुळे अनेक पक्षी सुद्धा या क्षेत्रात येऊ शकतात. मोठी वाढणारी साधारणतः आठ दहा फुटांवर ठेवावी, मध्ये मध्यम वाढणारे, त्यानच्यात मोठी झुडूप वर्गीय व मध्ये मध्ये छोटी छोटी झुडूप वर्गीय,फुलझाडे वगैरे ठेवावी. रोपांची अशी विभागणी करून जागेवर ठेवल्यावर लागवड करावी. लागवड साधारणतः दोन बाय दोन फूट ते तीन बाय तीन फुटावर करावी. या पद्धतीने प्रती एकर पाच ते दहा हजार रोपांची लागवड करता येते. लागवड झाल्यावर पुन्हा सर्व प्रदेशावर leafmould वा कोकोपीट आणि भाताचा भुसा वगैरे दोन ते चार इंचाचा थर द्यावा. ह्यामुळे दिलेले पाणी अधिक काळ टिकून राहते व झाडाच्या वाढीसाठी त्याचा दीर्घकाळ उपयोग होत राहतो. दाट लागवडीमुळे रोपांमध्ये सुर्य किरणांना मिळवण्यासाठी स्पर्धा(Competition) निर्माण होते, खाली मुळांना योग्य वातावरण, भरपूर पोषक तत्व, भरपूर ओलावा त्यामुळे रोपांची वाढ जोमात होत राहते. नेहमीच्या जंगलात जी वाढ कदाचित दहा ते वीस वर्षात झाली असती, तेवढी वाढ ह्या मीयावकि जंगलात चार ते पाच वर्षात होते. या दाटी वाटीच्या जंगलांची कार्बन, धूळे, धुके शोषून घेण्याची क्षमता अनंत पटीने वाढते. म्हणून मियावाकी प्रकारची जंगले औद्याकिक ...इंडस्ट्रिअल क्षेत्रात, जेथे प्रचंड प्रदुशन होते ,तेथे खूप उपयोगाची आहेत. नेहमीच्या जांगलांपेक्षा या जंगलांची कार्बन शोषणाची क्षमता तीस पटीने अधिक असते. योग्य जागा निवडून दोन मीटर बाय दहा मीटर पासून एक ते पन्नास एकराचे प्लॉट अश्या प्रकारे मियावाकी जंगलात बदलू शकतात. या पद्धतीत कमीत कमी पहिले तीन वर्ष नियमित पाणी द्यावेच लागते. मियावाकी जंगल वाढवण्याचा खर्च मात्र खूपच अधिक असतो. झटपट जंगल वाढीसाठी, प्रदूषण त्वरित कमी करण्यासाठी, पर्यावरणाची हानी लवकर कमी करण्यासाठी व उन्हाचा ताप त्वरेने सुसह्य करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब जरूर करावा. चला तर तयारी करू या.त्वरेने पर्यावरणात बदल घडऊ या. दुयौधन पाटील लोकशाही वार्ता न्यूज (ऑनलाईन न्यूज पोर्टल) मो.९३५९४४०५५६
byloksahi.varta.news
-
0