"ठेकेदारचा मनमानी कारभार चक्क मुख्य रस्ता खोदून काम अद्याप ही गुन्हा दाखल नाही! नागरिक त्रस्त, प्रशासन शांत! निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२९ - निजामपूर ता. साक्री, जि. धुळे एकीकडे सरकार “जल जीवन मिशन” अंतर्गत गावागावात पाणी पोहोचवण्याची भाषा करते आणि दुसरीकडे ठेकेदारांच्या मनमानीने गावकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त केलं जातंय. निजामपूर गावातील मुख्य रस्त्याचे झालेले हाल हे याचे ताजे उदाहरण ठरत आहेत.पहिल्यांदा मेन रोड डांबरीकरणासाठी नागरिकांची घरे तोडण्यात आली, आणि नंतर वाट पाहून रस्ता बांधण्यात आला. पण ते सुख फार काळ टिकले नाही. आता त्याच नव्या रस्त्यावर जल जीवन मिशन अंतर्गत पाइप टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम करण्यात आले, आणि रस्त्याचा अक्षरशः चिरड झाला!ठेकेदाराचा मनमानीचा नंगा नाच कोट्यवधींच्या निविदा मंजूर करून संबंधित ठेकेदाराने कोणतीही योग्य योजना, काळजी किंवा सहकार्य न करता रस्ता उकरला. ना पाटी, ना माहिती, ना प्लॅन — गावकरी उठतात तेव्हा समजतं रस्ता गायब झालाय! आणी या भ्रषटाचाराला कोणी विरोध करू नये म्हणून काही पद वाल्याना देखील मलिदा वाटला.. सुपरवायझरची सत्ता? की सरळसरळ दादागिरी? ठेकेदाराच्या सुपरवायझरला गावकऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर उलट उत्तरं मिळतात. त्याच्यावर ना ग्रामपंचायतचा वचक, ना सा.बा विभागाची उपस्थिती. “कोण काय करणार मला?” अशा थाटात सारा कारभार सुरू आहे.सा.बा. विभाग फक्त नावापुरता का? गावात खोदकाम सुरू असताना कोणताही शासकीय अभियंता फिरकलेला नाही, आणि कोणताही दर्जा तपासलेला नाही. १.६ मीटर खोदण्याचे आदेश असताना तोंडी सांगण्याना वरून काम सुरु आहे कि काय? आणि उर्वरित गाव उद्ध्वस्त.रस्त्याच्या एका बाजूच्या नागरिकांना दिला ‘फ्री हँड’ — कायदा कुठे?जिथं पाहावं तिथं खोदकाम, धुळीचा ढिगारा, लहान मुलं आणि वृद्ध लोकांना त्रास. वाहतूक विस्कळीत, अपघातांची शक्यता आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात.गावकऱ्यांची मागणी: तत्काळ ठेकेदारावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. सा.बा.विभाग,जल जीवन मिशन आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त पाहणी करून नुकसान भरपाई निश्चित करावी. रस्त्याचे पुनर्बांधकाम योग्य निकषांनुसार त्वरित करण्यात यावे.संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी व आरोप निजामपूर येथील निजामपुर अध्यक्ष काँग्रेस कमिटी चे तनवीर शेख यांनी केली आहे.
byloksahi.varta.news
-
0