क्रांती ज्योती पतसंस्थेच्या सचिवाची चौकशी करा: संचालकांची सहकार खात्याकडे तक्रार मयत संजय खैरनार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यामधून सचिव सोनवणे याने पैसे काढल्याचे पित्त उघड निजामपूर जैताणे ( परवेज सैय्यद) दि.३०- धुळे जैताणे ता साक्री येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या सचिवाने आर्थिक गैर व्यवहार केला असून चक्क मयत झालेल्या व्यक्तीच्या खात्यामधून बनावट सही करून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे, याच प्रकारे अनेक आर्थिक गैर व्यवहार सचिवाने केले असल्याचा संशय असल्याने सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या सर्व व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी त्या पतसंस्थेच्या संचालकांनीच सहकार खात्याकडे केली आहे. श्रीमती संगीता संजय खैरनार, राजबाई नंदू खैरनार यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज दाखल केला आहे त्यात म्हटले आहे की माझे पती संजय खैरनार यांचे दि २७ एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर देखील त्यांच्या मरणाच्या आठव्या दिवशी पतसंस्थेच्या सचिवाने स्वतःची बनावट सही करून पैसे काढून घेतले आहेत, मयत खैरनार यांचे खाते स्टेटमेंट काढले असता हा प्रकार समोर आला आहे, याच प्रकारे सचिव पंढरीनाथ सोनवणे याने अनेक आर्थिक घोटाळा केला असल्याचे नमूद केले आहे तसेच सदर सचिव हा दोन वेगवेगळ्या पदांचे स्वतः पगार लाटत आहे, बेकायदेशीर कर्ज वाटप करणे, स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने कर्ज घेऊन सचिवाने अफरातफर करून संस्थेची व सभासदांची फसवणूक केली आहे आणि यासाठी त्याला काही संचालक मदत करीत असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे, त्याने आर्थिक अपहार करून स्वतःसाठी लाखो रूपयांच्या जमिनी, इमारत व इतर व्यवहार केलेले आहेत त्याच्या संपत्तीची देखील चौकशी करावी असे अर्जात नमूद केलेले आहे.*सोसायटी स्थापनेत हडप केले लाखो रुपये* :- सदर पतसंस्थेच्या सचिवाने मागील वर्षी जैताणे विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली असून त्यासाठी संचालक व सभासद यांचे कडून लाखो रुपये वसूल केले आहेत सर्व संचालकांची चौकशी करण्यात यावी असे देखील अर्जात नमूद केले आहे.
byloksahi.varta.news
-
0