मी गं.भा. सुनंदा श्रीराम पाटील राहणार मौजे नगांव ब्रु. ता.जि. धुळे मी गेल्या अनेक वर्षापासून नगांव गावातील मौजे नगांव ब्रु. ग्रुपग्रामपंचायत मधे असेसमेन्ट रजिष्टर मधे नोंद असलेली मिळकत मालमत्ता अनुक्रमांक१५०८ व मालमत्ता क्रमांक १२५८असून मी दरवर्षी घर पट्टी , पाणी पट्टी , दिवा बत्ती , असे शासना चे कर देत गेली असून माझ्या वरती नगांव ग्रामपंचायत चा कुठलाही कर थक बाकी नसून मी दरवर्षी घर पट्टी पाणी पट्टी रेगुलर भरत असते तसेच वर्षातून ३ ,४ वेळा घराचे उतारे देखिल काढत असते व नगांव गावातील ग्रामसेवक हे देखिल रितसर मला माझ्या घराचा उतारा देतात मी मागच्या वर्षाची व या वर्षाची घर पट्टी भरल्यावर देखिल ग्रामसेवकांनी माझी घराची जागा ग्रामपंचायत मधे जप्त करणाचे आम्हाला सांगितले जात आहे मी त्यांना विचारले की , माझ्या घराची जागा ग्रामपंचायत मधे का जमा केली जात आहे नगांव गावातील ग्रामसेवक आम्हाला असे सांगतात की , गावातील काही लोकांना घरकुल साठी घर बांधायचे आहे व तुमची जागा ग्रामपंचायत मधे जमा करून त्या जागेवर दुसर्या व्यतीला घरकुल चे घर बांधून द्यायचे आहे असे आम्हाला सांगण्यात येत आहे आम्ही त्यांना नकार केला व त्यांनी आमच्या विषयी संबंधीत पोलिस स्टेशन मधे ग्रामपंचायत च्या लेटर पँड वरती नगांव गावातील सरपंच , व उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत लेटर पँड वरती सह्या करून ग्रामपंचायत चा शिक्का मारून आमचे विषयी तक्रार दिली आहे ती तक्रार अशी की सदर मौजे नगांव ब्रु ग्रुप ग्रामपंचायत येथिल रहिवाशी गं.भा. सुनंदा श्रीराम पाटील यांनी नगांव गावातील गावठाण मधे अतिक्रमण केले आहे आम्हाला धमकवण्यात येत आहे की जर तुम्ही त्या जागेहून कंपाऊट काढले नाही तरी आम्ही जी. सी. बी. च्या साह्याने तुमचे कंपाऊट तोडून टाकू असे आम्हाला सांगितले जात आहे व तसेच धमकवण्यात येत आहे तसेच यांनी माझ्या मुलाला धमकवण्यात आले आहे की तु जर कंपाऊट काढले नाही तर तु आळचणीत येशील असे ग्रामसेवकाने धमकाऊन सांगितले जात आहे माझे माय बाप जनता हे मी तुम्हाला हे दाखवित आहे की , मी नगांव गावातील गावठण मधे अतिक्रमण केले नसून माझ्या कडे जो माझ्या नावावर असेलेली मिळकत घराचा उतारा आपल्या समोर ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत तून दिलेला उतारा आता तुम्ही पाहून घ्या मी कुठे अतिक्रमण केले आहे का ? आणि तसेच दुर्योधन श्रीराम पाटील म्हणजे माझ्या मुलाला धमकवण्यात येत आहे व या आगोदर ही धमकवण्यात आले आहे जर तुम्ही कंपाऊट काढले नाही तर तुम्ही आळचणीत याल म्हणजे असे धमकविले जात आहे माझे माय बाप जनता मी आपणास हात जोडून विनंती करते की , आमच्या वरती दया करा आम्हाला मदतीच एक हात पुढे करा मी आपल्या कढे हात जोडून मदत मागत आहे हा ग्रामसेवक व नगांव गावातील ग्रामपंचायत माझ्या मुलाला कुठल्यानां कुठल्यां कारणास्थ अळचीणीत छळयंत्र रचून आडकविण्याचा प्रयास सुरू आहे तसेच मला कुणाचा सहारा नसून मला फक्त माझ्या मुलालाचाच मला सहारा आहे गेल्या २००६ मधे माझे पती मरण पावले मला कुणाचा सहारा नाही फक्त माझ्या मुलाचाच सहारा घेऊ आम्ही आमचे उदरर्णिवाह करीत आहो आणि काल ग्रामसेवक यांनी आम्हाला फोन करून सांगितले आहे की तुम्ही जर कंपाऊट काढले नाही तर आम्ही आज जे.सी.बी. घेऊन येत आहे व तुमच्या जागेचे कंपाऊट काढून टाकू माझे माय बाप जनते आपणच न्याय करू शकाल अशी माझी शंका आहे गेल्या अनेक वर्षापासून माझे घर बांधलेले होते मागच्या आवकाळी पावसात त्या घराच्या भिंती पाण्यामुळे पडल्या व घराचे नुकसान झाले व ती जागा पळक्या आवस्थेत झाल्यामुळे त्या ठिकाणी कुणीही अतिक्रमण करणार नाही कींवा अतिक्रमण होणार नाही या करीता मी संरक्षण म्हणून तार चे कंपाऊट वाळले असून आज रोजी गावातील ग्रामसेवक जे सी बी घेऊन येणार आहेत माझ्या जागेचे कंपाऊट तोढायला येणार असे काल आम्हाला फोन द्वॉरे सांगितले आहे
byloksahi.varta.news
-
0