-->

दि. १३ गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये "जागतिक एड्स जनजागृती कार्यक्रम नगांव -येथील गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स विषयी जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.ग्रामीण रुग्णालय, सोनगीर येथील समुपदेशक शीतल पाटील मॅडम व कैलास वाडीले सर यांनी विद्यार्थ्यांना HIV एड्स आजाराबाबत समुपदेशन व मार्गदर्शन केले.एड्स चें उच्चाटण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.एड्स जनजागृती सप्ताह निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनकरता एड्स जनजागृती विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस. व्ही.चोरडिया, रेड रिबन क्लबचे समन्व्यक प्राजक्ता भदाणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. तसेच या कार्यक्रमातील विजेत्यांचे व सहभागी सर्व विदयार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री मनोहर भदाणे, उपाध्यक्षा सौ. ज्ञानज्योती भदाणे व अध्यक्ष श्री राम भदाणे यांनी कौतुक केले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post