-->

दि.२३ नगांव - गंगामाई फार्मसी महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सायली बडगुजर ची खो - खो आतर विद्यापीठ स्पर्धा साठी निवडनगाव:- नगाव एज्युकेशन सोसायटी चे गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय नगाव येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू बडगुजर सायली किरण चतुर्थ वर्ष बी. फार्मसीत शिक्षण घेत असून, तीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अंतर्गत आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धा साठी निवड झाली आहे. हि निवड होण्यासाठी तिने धुळे झोनल व विद्यापीठ स्तरीय टप्पे पार केल्यावर झाली आहे. आता पुढील आंतरपिद्यापीठ खो-खो स्पर्धा अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ, रेवा मध्यप्रदेश येथे २४ - २७ जानेवारी २०२४ रोजी होणार असून ती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कडून प्रतिनिधीत्व करणार असून त्यासाठी तिला संस्थेचे अध्यक्ष मा. राघवेंद्र भदाणे, सचिव मा. मनोहरजी भदाणे, उपाध्यक्ष माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद, डी. फार्मसी चे प्रमुख डॉ. विनोद वाघ यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नुकतेच तिची क्रीडा कोट्यामधून पोस्टमन या पदी सुद्धा निवळ झालेली आहे.तसेच, डॉ. जयश्री पाटील, प्रा. तुषार साळुंखे, प्रा.अनवर चौधरी, प्रा. कुंदन देवरे, प्रा. जयश्री पावरा यांनीहि तिला पुढील खेळासाठी शुभेछया दिल्या. याचवेळी क्रीडा प्रमुख प्रा. सज्जाद अन्सारी व प्रा. कुणाल पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post