-->

दि.१६ धुळे - विजय पाटील यांना स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार प्रधान राज्य पातळीवरील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य (पुणे) या संस्थेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा "स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार" नवोदय विद्यालय,अक्कलकुवा येथील संगणक शिक्षक (संविदा) राहणार कंचनपुर (ता.शिंदखेड़ा) येथील श्री.विजय शांताराम पाटील अध्यक्ष दिल से फाउंडेशन यांना पत्रकार भवन, नवी पेठ पुणे येथे दिनांक १३/०१/२०२४ रोजी सेवानिवृत्त मुख्य वनरक्षक नागपूर रंगनाथ नाईकडे(भा.व.से), अध्यक्ष बुक क्लब पुणेचे संचालक अविनाश निमसे,समाज प्रबोधन संस्था आळंदीचे ह.भ.प प्रल्हादजी महाराज डांगे , मंथन फाउंडेशनच्या संस्थापिका आशाताई भट, सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे सचिन म्हसे, युवकमित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. मागील चार वर्षापासून रक्तदान चळवळीत अमूल्य योगदान व वाचनालय चळवळीत मोलाची भूमिका तसेच गरजु व्यक्तिस मदत,तरुण,विद्यार्थी मार्गदर्शन तसेच प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरिने सहभाग असे अनेक प्रकारच्या कार्याची दखल घेत विजय पाटील यांची राज्य पातळीवरील या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.विजय पाटील यांच्या कामगिरिचे सर्वदूर कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post