दि.२४ नगांव - आयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्तधुळे तालुक्यात अनेक गावांना राम मंदिराच्या प्रतिकृतीची जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून शोभायात्राधुळे ता.२४ - हिंदुस्थातील प्रत्येक हिंदूच्या मना-मनात असलेले राम मंदिर आयोध्येत त्याच जागेवर उभे राहिले आहे. त्याचा आनंद सर्व भारतीयांना होत आहे. आयोध्यातील राम मदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त भाजपाचे धुळे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून आयोध्यातील उभारलेल्या राम मंदिराची प्रतिकृतीची शोभायात्रा धुळे तालुक्यात मोठ्या उत्साहात नगांव, सोनगीर, कापडणे, शिरुड, देऊर, नेर, कुसुंबा, लामकाणी, बोरकुंड, रतनपुरा, मुकटी यांसह अनेक गावांमध्ये काढण्यात होती. तसेच संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक घरा-घरांत राम मंदीराच्या अक्षदा व पत्रिका वाटप करण्यात आल्या होत्या. या शोभायात्रेत राम,सिता,लक्ष्मण, हनुमान यांचा देखावासह, मुला-मुलींचे लेझीम पथक, भजनी मंडळ, डीजे, वाजंत्रीसह प्रभूरामचंद्र की जय, बजरंग बली की जय, अशा जयघोषाने तालुका गेले पाच ते सात दिवसांपासून श्रीरामाच्या घोषणांनी मंत्रमुग्ध झालेला होता. शोभायात्रेत महिला-पुरुष स्वस्फुर्तीने सहभागी होत होते. गावां-गावांत एकच श्रीरामाच जयघोष सुरु होता. हृदयातील राम मंदिरात बसणार याची उत्सुकता सर्वांनाच होती ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. धुळे तालुक्यात सदर शोभायात्रा भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या संकल्पनेतून तालुक्यात काढण्यात आलेली होती.या शोभायात्रेत माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, माजी पं.स.सभापती तथा लोकनियुक्त सरपंच सौ.ज्ञानज्योतीमाई भदाणे तसेच तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य मोठ्या संख्येने या शोभायात्रेत उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0