-->

धुळे दि. १५ - संत सेवालाल महाराज जयंती जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या उपस्थितीत जापी तांडा, सिताणे तांडा उत्साहात सागरीधुळे संत सेवालाल महाराज जयंती निमित्त जापी तांडा, सिताणे तांडा, पाडळदे मोरशेवडी येथे जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व बंजाराचा समाज बांधवांनी केलेले होते. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामुहीक अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे विधानसभा निवडणूकप्रमुख तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांच्यासह समाज बांधव-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांसमोर बोलतांना राम भदाणे म्हणालेत संत सेवालाल महराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मीक क्षेत्रातील एक सुधारक होते. क्रांतीसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी झाला. संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखला, समाज उद्धाराचे काम त्यांनी केले आहे. संत सेवालाल महाराजांनी दिलेली प्रतिज्ञा केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहे. बंजारा समाज हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महारापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा दिलेली आहे असे यावेळी बोलतांना जि.प.सदस्य राम भदाणे म्हणालेत. जि.प.सदस्य राम भदाणे यांनी धुळे तालुक्यातील बंजारा समाजाच्या जापी तांडा, सिताणे तांडा, मोरशेवडी, पाडळदे तांड्यामध्ये जाऊन संत सेवालाल महाराजांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने तरुण व समाज बांधव उपस्थित होते. जि.प.सदस्य राम भदाणे


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post