धुळे दि.१६ - धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपाचे जि.प.सदस्य राम भदाणे यांचीगांव चलो अभियानांतर्गत देऊर गटांतील गावांना भेट भारतीय जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान‘ राबविण्यात येत आहे. तळागाळातील प्रत्येक नागरिक आणि मतदारापर्यंत मोदी सरकारची मागच्या १० वर्षातील कार्य, योजना, मागील जाहीर नाम्यातील दिलेल्या आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प इ. पद्धतीची माहिती पोहोचवण्याचा उद्देश या अभियानातून सुरु असून धुळे ग्रामीण मतदार संघातील देखिल भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे यांचा गाव चलो अभियानांतर्गत देऊर गटात आज मुक्कामी दौरा सुरु असून यावेळी संपूर्ण गावांतील, वाड्या-वस्त्यांमधील ग्रामस्थांच्या व महिलांच्या समस्या जाणून घेत असून ते सोडविण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासीत केले. या अभियानाच्या अनुषंगाने जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांचा आज देऊर गटातील लोणखेडी, लोहगड, नांद्रे, उभंड असा प्रवास दौरा आयोजित करण्यात आला होता. उद्या राहिलेली देऊर बु, देऊर खु, मोराणे, पिंपरखेड, चौगांव असा दौरा राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गाव चलो अभियानाची सुरुवात लोणखेडी गावातील मंदिरात पूजा करून व मंदिर परिसर स्वच्छ करून स्वच्छ भारतचा संदेश देत करण्यात आली. या दौऱ्या अंतर्गत गावां-गावातील सर्वसामान्य ग्रामस्थ, महिला भगिणी, विविध प्रतिष्ठित व्यक्ती, भाजप-जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या घरी भेट देण्यात आली. भारतीय जनता पक्ष हा विकासाचे ध्येय ठेवून करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागील १० वर्षांतील प्रभावी कार्य, मागील जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे सदर गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. मोदींची हमी काय, हे प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली. या अभियानांतर्गत पक्षाचे आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्याबरोबर सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक गटात प्रवास करीत आहेत. प्रत्येक गटात भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करत असून यावेळी बूथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे सुरु आहेत. आज झालेल्या गाव चलो अभियानांत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य यांच्या सोबत भाजपाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प.सदस्य राम भदाणे
byloksahi.varta.news
-
0