-->

धुळे दि.१५ - धुळे ग्रामीण भाजपाचा दिवार लेखन अभियानासभाजपाचे विधानसभा निवडणूकप्रमुख राम भदाणे यांच्या हस्ते शुभारंभ धुळे भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे बघीतले जाते. प्रधानमंत्री मोदीसाहेबांच्या नेतृत्वामुळे भारत देश हा जगात पाचव्या क्रमांकावर पोहचलेला आज आपल्याला पाहवयास मिळत आहे. येणाऱ्या काळ देशासाठी आणि देशवासीयांसाठी महत्वाचा असून यासाठी भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत जाऊन आपले सामाजिक, शैक्षणिक काम करीत आहे. भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीच्या मार्गदर्शनाने धुळे ग्रामीण मध्ये दिवार लेखन अभियानास नगांव ता.जि.धुळे येथून भाजपाचे धुळे ग्रामीणचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या हस्ते गावातील घराच्या भिंतीवर कमळ चिन्ह व त्याच्या खाली फुन्हा एकदा मोदी सरकार असे रंगविण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. देशाच्या गतिमान विकासासाठी पुन्हा मोदीजींच्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याने भारतीय जनता पटीार्टीच्या आदेशाने धुळे ग्रामीण भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांनी काल दि.14 फेब्रुवारी रोजी नगांव गावांतील महादेव गल्लीतील भिंतीवर कमळाचे चिन्ह काढून पुन्हा एकदा मोदी सरकार घोष वाक्याचे रेखाटन करत दिवार लेखन अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १ ते ३७५ बुथ मध्ये दिवार लेखन करण्यात येणार असून प्रत्येक बुध मध्ये सुमारे ५ ते 1१० दिवार लेखन करण्यात येणार आहेत. सुमारे ५ हजार दिवार लेखन संपूर्ण धुळे ग्रामीण विधान सभा मतदार संघातील प्रत्येक बुथ मध्ये करण्याचे काम सुरु आहे. यासाठी सर्व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहे. अशी माहिती विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांनी दिली आहे. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रामदास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य व महिला उपस्थीत होत्या, यावेळी संपूर्ण नगांव गावातील बुथ मध्ये कमळ चिन्ह व पुन्हा एकदा मोदी सरकार असे दिवार लेखन करण्यात आलेत तसेच रोज १५ ते २० गावांवा सदरचे दिवार लेखन अभियान सुरु आहे अशी माहिती जि.प.सदस्य राम भदाणे यांनी दिली आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post