-->

*भारत जोडो न्याय यात्रा:महिला न्याय हक्क परिषदेत राहुल गांधी करणार महिलांशी संवाद.* दि.११ धुळे - (गोकुळ देवरे) भारत जोडो न्याय यात्रा दि.१३ मार्च रोजी धुळे शहरात येतं आहे दुपारी ११:३० वा.वालचंद बापू हॉटेल जवळ गुरू व्दारा शेजारी, धुळे मालेगाव रोड येथे होणाऱ्या महिला न्याय हक्क परिषदेत खा.मल्लिकार्जुन गर्गे साहेब, राष्ट्रीय सरचिटणीसके.सी.वेणूगोपाल ,खा.दिगविजय सिंग,जयराम रमेश, कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात,विजय वडेट्टीवार, महिला कॉग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा,ए.आय.सी.सी.सहप्रभारी सोनलबेन पटेल ,आ.कुणाल पाटील,प्रतिभा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.देशभरात मागील दहा वर्षांत महिला मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे.बलात्कारी नरधामाची बाजू रस्त्यापासून संसदेपर्यंत सत्ताधारी घेतं आहेत.जीवनावश्यक वस्तूंची महागाई केंद्र सरकारच्या आशीर्वादाने प्रचंड वाढलेली आहे.याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे.वाढती बेरोजगारी महिला मुलींच्या रोजगाराचा प्रश्न अधोरेखित करतं आहे.नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील मुलींचे प्रश्न वाढले आहेत.दलित आदिवासी, अल्पसंख्याक,ओबीसी, शेतकरी, शेतमजूर वर्गातील महिलांना केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा सर्वाधिक त्रास होतं आहे.याला वाचा फोडण्यासाठी धुळे शहरात भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महिला न्याय हक्क परिषदेत राहुलजी गांधी महिलांशी संवाद साधणार आहेत.धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या महिला न्याय हक्क परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन कुणाल पाटील, काँग्रेस नेत्या सह प्रभारी सोनलबेन पटेल, प्रतिभा शिंदे,अश्विनी कुणाल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post