-->

*धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा बेभरोसावर संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलेही वचक नाही विकास कामांचा निधी केवळ दलित असल्याने नाकारले,आगामी निवडणुकीत सर्व आंबेडकरी बहुजन समाजाला एकत्र करून ताकद दाखवू.-कपिल दामोदर.* दि.११. धुळे - (गोकुळ देवरे) धुळे जिल्ह्यातील होणाऱ्या विकासकामांना विकास कामे करतांना कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी न तपासता धुळे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी बेकायदेशीर मान्यता व निधी देणार आहे.अशी बाब समोर आली आहे.की जिल्हा परिषद धुळे येथील रस्ते मार्ग व पुल जन सुविधा, तिर्थक्षेत्र इ.असलेल्या योजना तसेच धुळे महापालिकेतील संबंधित प्रशासकीय अधिकारी हे दलित वस्ती सुधार योजना व नगरोत्थान या योजनांना धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा नियोजन बजेट होणार आहे.हा शासनाचा पैसा आहे.तो योग्य ठिकाणी कायदेशीर खर्च केला पाहिजे या विकास कामांना तांत्रिक बाबी न तपासता विकास कामांचा प्रस्ताव संबंधित अधिकारी मा.जिल्हाधिकारी सो.धुळे यांना पाठविण्यात येणार आहे.जिल्हा परिषद धुळे व महानगरपालिका धुळे विकास कामांची तांत्रिक बाबी तपासणी केल्याशिवाय कुठल्याही मान्यता देवू नये.निधी देवू नये या मागणीचे निवेदन दि.११मार्च २०२४ रोजी मा.नितीन गावंडे सो उपजिल्हाधिकारी(निवासी)सो धुळे यांना भिमशक्ती या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच धुळे शहरातील दसेरा मैदान लगत फायनल प्लाॅट न.१५३ येथे काही दिवसांपूर्वी धुळे लोकसभा मतदार संघाचे खा.सुभाष भामरे वं शहराचे भाजपाचे गजेंद्र अंपळकर यांनी धुळे महापालिका, धुळे नगरभुमापन कार्यालय यांच्या भोंगळ कारभारामुळे शासकीय जमीन एका खाजगी व्यक्तीच्या नावाने झालेली असतांना तो जमिन पाठपुरावा करून त्या जागेवर शाॅपिंग काॅम्प्लेक्स बांधण्यात येत असल्याने मी त्यांचे देखील अभिनंदन करतो. परंतु शाॅपिंग काॅम्प्लेक्स बांधताना धुळे महापालिका,इतर काही कार्यालयातील अधिकारी अथवा काही लोकप्रतिनिधी त्या शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये गाळ्यांचे लाभार्थी राहाणार नाही याचीही‌ काळजी घेतली पाहिजे.शाॅपिंग काम्प्लेक्स बांधकाम पुर्ण झाल्यानंतर लाभार्थी राहाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.शाॅपिंग बांधकाम पुर्ण झाल्यानंतर गाळा मालकांची नावांची यादी जाहीर केली पाहिजे. तसेच धुळे शहरातील शासकीय जमीन आणखी किती खाजगी व्यक्तींच्या नावाने झाले हे देखील काढणे काळाची गरज आहे.आम्ही वलवाडी येथील सर्व्हॆ क्रमांक ७३.शासकिय भूखंडावर भव्य दिव्य माॅल या जागेवर बांधणार हा माॅल झाल्यानंतर हजारो तरुणांना रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे.त्या ठिकाणी आम्ही सर्व जाती धर्माच्या तरुण मुलांना रोजगार देवू तसेच धुळे जिल्ह्यातील बाहेरील मोठे उद्योग धुळे जिल्ह्याचा विकास करु असेही आवाहन पत्रकार परिषदेत केले आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post