-->

निजामपूर-जैताने गावात वारंवार विज पुरवठा खंडित " उष्ण तापमान उकाड्याने नागरिक हैराण,, राजकीय, सामाजिक संघटना कोणीच जाब विचारला तयार नाही,, नागरिकांचा सवाल...? निजामपूर -जैताने दि.२५ (परवेज सैय्यद) - निजामपूर - जैताने शहरात विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उष्ण तापमान उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत... यावर बोलण्यासाठी कुठलेही राजकीय, सामाजिक संघटना पुढे सरसावत नसल्याने सर्व सामान्य त्रस्त झाले आहेत यावर बोलण्यासाठी कुठली संघटना, कुठला पक्ष, कुठला नेता,पुढे कधी येईल अशी सर्वसामान्य नागरिक अपेक्षा व्यक्त करतो...याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील सर्व सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.‌‌.‌ दिवसातून अनेक वेळा एक एक तास विज वितरण कंपनी पुरवठा खंडित करत असल्याचे चित्र आहे.. एकीकडे तापमानाचा पारा 43 ते 44 वंशावर पोचला आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. शहरातील दिवसभरात एक एक तास वीज पुरवठा खंडित करून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दुसरीकडे घरातील विजेवर चालणारे यंत्र देखील वीज ये जा करत असल्याने खराब होत आहे तें नुकसान देखील येथील व्यापारी वर्ग व गरीब जनतेला फटका देत आहे .. त्यात खास करून रात्री झोपायच्या वेळेसच शहरातील पूर्ण विज पुरवठा खंडित करत असल्याने नागरिकांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे महावितरण लाईट बिल थकले कि वसुली कमालीची करत असतात मात्र सेवा पुरविण्याची वेळ आली का पाठ फिरवितात असा संताप ग्रामस्थ मधून होत आहे. यावर बोलण्यासाठी शहरातील राजकीय विरोधक सत्ताधारी पक्ष तसेच सामाजिक संघटना एकही जाब विचारण्यासाठी पुढे सरसावत नसल्याने सर्वसामान्य नागरिक संताप करत आहे..‌ या त्रासाला एखादी संघटना पुढे सरसावले का..? महावितरण कंपनीला जाब विचारेल का..? एखादे आंदोलन छडेल का..? असा सवाल उपस्थित केला जात आहे... यात खास करून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वितरण कंपनीचे लाईनमन, वायरमन, शहर अभियंता कार्यकारी अभियंता भ्रमणध्वनी बंद करून ठेवत किंवा समाधानी उत्तर देत नसल्याचे सांगितले जात आहे. यात सर्वसामान्य नागरिक अधिक संतापले असल्याचे बोलले जात आहे..


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post