निजामपूर गावात अवेध धंदयांना अभय कोणाचे? कारवाई ची मागणी....ईश्वर न्ह्याळदे साक्री दि.२३(परवेज सैय्यद) - तालुक्यातील निजामपूर गावात बस्थनाक का लगत सट्टा,जुगार,क्लब खुलेआम पणे सुरू असून यांना परवानगी कोणाची? यांच्या वर कारवाई होईल का? निजामपूर बस्थानक बनले नशा खोरी,सट्टा खोरी,ठिकाण,टवाळ खोरांचे प्रमाण देखील वाढले आहे. शाळकरी विद्यार्थी-विधार्थिनी चे देखील बस स्थानकला थांबणे कठीण झाले आहे.अवेध धंदयामुळे तरुण मंडळी देखील या गोष्टी चा शिकार होत आहे, व सम्पत चाली आहे.अवेध धंद्ये चालकांना कायद्याचे वचक राहिले नाही हे स्पष्ट होत आहे. निजामपूर पोलीस सेटशन चे एपीआय यांना तोंडी तक्रार करून देखील त्यांणी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ईश्वर न्ह्याळदे यांनी केला आहे. निजामपूर परिसरात अवेध धंदे मोठ्या प्रमाणवार सुरू असून गावातील नागरिक देखील संताप व्यक्त करत आहे.प्रत्येक चौकात गल्ली मध्ये सट्टा सुरू आहे यांच्या वरती कारवाई कधी होईल,अवेध धंद्या मुळे गावातील शांतात धोक्यात येऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते,म्हणून पोलिसानी या अवेध धंद्या वरती कारवाई करून सर्व अवेध धंधे बंद करावे,अन्यथा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यलयावर मोर्चा काढलं जाईल असा इशारा माजी सरपंच ईश्वर न्ह्याळदे यांनी दिला आहे.
byloksahi.varta.news
-
0