गंभीर आजारी वर्ग मैत्रीणी साठी निजामपूरच्या इ १० वी १९८२ बॅचच्या विद्यार्थ्यांचे अहमदाबादला गेट टुगेदर निजामपूर दि.१४ ( परवेज सैय्यद ) - निजामपूर- जैताणे येथिल आदर्श विद्या मंदिर या शाळेतील १९८२ सालच्या इ १० वी च्या विद्यार्थी विद्यार्थींनींनी आपल्या गंभीर आजाराने ग्रस्त वर्ग मैत्रीण विभा शाह साठी अहमदाबादला जाऊन गेट टुगेदर चा कार्यक्रम साजरा केला ४२ वर्षानंतर भेटलेल्या आपल्या आजारी वर्ग मैत्रीणी पाहुन सर्व मित्रमंडळी भाऊक झाली होती गेल्या वर्षी १,२ व ३ जुलै रोजी या बॅचचे गेट टुगेदर निजामपूर येथे शाळेच्या आवारात अत्यंत दिमाखात साजरे झाले होते या कार्यक्रमासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत, सेल्वास, ठाणे, मालेगांव, धुळे, शिरपूर, नंदुरबार, निजामपूर, जैताणे, भामेर, खुडाणे, आखाडे, व परिसरातील माजी विद्यार्थी उपस्थित होते परंतू या बॅचची सर्वात सुंदर, हुशार, गुणी विद्यार्थिनी विभा शाह ही गंभीर आजारा मुळे या कार्यक्रमासाठी येऊ शकली नाही तेव्हाच सर्व मित्रमंडळींनी अहमदाबादला जाऊन विभा शाह सोबत गेट टुगेदर साजरे करण्याचा निश्चय केला होता त्याचा परिपाक १० , ११ व १२ रोजी अहमदाबादला स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाला मुंबईहुन चंद्रशेखर चिंचोले, नाशिक येथून रजनी पंजाबी, भूमिका पंजाबी, वंशिका पंजाबी, धुळे येथुन रत्ना पाटील, योगेश सुर्यवंशी, शिरपूर हुन संगीता कटारिया, निजामपूर हून खुदाबक्ष शेख, दिपक कासार, राजेंद्र जयस्वाल, अस्लम शेख, दोंडाईचा हून कैलास कापडणे, कल्पना कापडणे, जमीला शेख उपस्थित होते या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना विभा शाह भारावून गेली "तुमच्या सारख्या मित्र मैत्रिणींच्या मोरल सपोर्ट मुळेच मी कॅंसर सारख्या आजाराशी खंबीर पणे लढत आहे व पुढेही लढत राहु "कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कैलास कापडणे यांनी केले तर आभार चंद्रशेखर चिंचोले यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन संगीता कटारिया-रेलन व खुदाबक्ष शेख यांनी केले
byloksahi.varta.news
-
0