-->

सपोनि गायकवाड व त्यांच्या टीम मुळे रिजवान शेख चे फोन पे चे पैसे मिळाले परत साक्री निजामपूर दि. ०८( परवेज सैय्यद) - दिनांक ०७/०६/२०२४ रोजी संध्याकाळी ०७:३४ मिनीटाने मी रिजवान शेख याच्या ओळखीचे असलेले अक्षय विसपुते यास त्यांचा फोन पे नंबर वर ६५००/-रुपये सेंन्ड करीत असताना त्यांच्या कडुन नजर चुकीने दुसरा फोन पे नंबर वरती ६५००/-रुपये नजर चुकीने सेंन्ड केले असुन त्याने लागलीच सदर मोबाईल नंबर वर फोन करून त्यांच्या कडुन चुकुन आपल्या फोन पे खात्यावर ६५००/- रुपये टाकले गेले असुन ते मला परत करा या बाबत रिजवाने फोन व्दारे त्या व्यक्तीस विंनती केली. असतांना सदर फोन पे धारक यांने त्याला सांगितले की, तुम्ही फ्रॉड असुन माझी फसवणुक करणार आहे तुम्ही कंपनी कडुन मला फोन करा या बाबत सागितले पंरतु रिजवन कमी शिकलेला असल्याने त्याचा मित्र अक्षय विसपुते व सदर फोन पे धारक यांचा मोबाईल मध्ये बराच साम्य असल्याने त्याच्या कडुन चुकुन फोन पे ला ६५००/-रुपये सेंन्ड केले गेले असुन तो अंत्यत गरीब तसेच मजुरी करुन त्याचा परीवार चा उदर निर्वाह भागविणारा असुन सदर पैसे सेंन्ड झाल्याने त्याच्या वर आर्थिक संकट ओढवले गेले आहे.असे सपोनि गायकवाड यांना पोलीस स्टेशनला जाऊन कळवले सपोनि गायकवाड यांनी लागलीच आपल्या कर्मचारीनां सूचना देऊन त्यांची दखल घेत पो.को सुनील अहिरे यांनी सदर व्यक्ती ला फोन द्वावारे संपर्क करून त्यांची खात्री करून व त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून दिले कि रिजवान शेख याच्या कडून चुकून तुमच्या फोनपे ला पैसे आले आहे आपण तें परत त्यांना टाकून त्यात तें आपली कुठली ही फसवूणूक करत नाही. ते पोलीस स्टेशनला आले आहे. आपण सहकार्य करा असं त्यांना सांगितले. व त्या व्यक्ती ने पोलीस कर्मचारी सुनील अहिरे हे खर माहिती सांगत आहे याची दखल घेत अवघ्या १५ मिनटात पैसे टाकले व रिजवान शेख यांनी सह परिवार सपोनि गायकवाड व पो.को.सुनील आहिरे,पो.को चव्हाण याचे खूप आभार व्यक्त केले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post