मुकटी केंद्रात १० वी त प्रथम येणाऱ्या भाग्यश्री पाटील चा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते सत्कार धुळे दि.०१ - या वर्षी १० वी चा धुळे तालुक्याचा ९१.८४ टक्के निकाल लागला असून यांत मुलींची बाजी मारली आहे. मुकटी केंद्रात चिंचखेडा येथील जय भवानी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील कु.भाग्यश्री पाटील हिस इयत्ता १० वीत ९२ % मिळाले असून प्रथम क्रमांक मिळविला आहे सदर विद्यार्थीनीचा सत्कार भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) मनोहर भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती भैय्या पाटील, माजी सरपंच हरी वना मोरे, भाजपाचे अरविंद पाटील, काळखेड्याचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे शुभेच्छा देतांना म्हणालेत की, नुकताच १० वीचा निकाल लागला असून यांत विद्यार्थीनींनी बाजी मारली आहे. धुळे तालुक्यात ९२.३६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून ९१.४५ टक्के मुल उत्तीर्ण झालेले आहेत. दिवसें दिवस मुलींच्या टक्केवारीत वाढ होत असून आज खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या मदतीने सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेला मुलींच्या शिक्षणासाठी केलेला खडतर प्रवासामुळेच आज महिला प्रगतीपथावर जात असतांना दिसत आहे. म्हणजे महिला आज सांस्कृतिक, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत. आज आपल्या देशाचे राष्ट्रपती एक महिला आहेत याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे असे यावेळी बोलतांना म्हणालेत. यावेळी जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते मुकटी केंद्रात प्रथम व चिंचखेडा येथील माध्यमिक शाळेत प्रथम येणाऱ्या कु.भाग्यश्री पाटील(९२ %), शाळेत द्वितीय येणाऱ्या कु. प्रियंका पाटील(९०.६०%) व तृतिय येणाऱ्या कु.डिंपल दिपक देसले(९०.२० %) विद्यार्थींनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी चिंचखेड्याचे माजी सरपंच हरी वना मोरे, सोनू देसले, शिवाजी मराठे, दिपक देसले, नंदू पवार, मनोहर मोरे, लालचंद देसले, संजय मोरे, टीनू देसले, किरण मोरे यांच्यासह वरील विद्यार्थीनींचे पालक उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post