-->

गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतांना अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांस विद्यार्थी कल्याणनिधी मार्फत ५ लाख १० हजार विमा रक्कमेचा धनादेश सुफुर्त धुळे दि. ३० - तालुक्यातील गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग द्वितीय वर्षाचा विद्यार्थी चिमठाणे ता. शिंदखेडा येथील प्रथमेश भीमराव अहिरे याचा दुर्देवी अपघाती दुःखद निधन झाले होते. त्याच्या अपघाती निधनामुळे महाविद्यालयाने सदर विद्यार्थ्याच्या पालकास विद्यार्थी कल्याण निधी व महाविद्यालयाच्या ग्रुप इन्शुरंन्स च्या माध्यमातून रुपये ५ लक्ष १० हजार रक्कमेचा धनादेश नुकताच सदर विद्यार्थ्याच्या पालकास नगांव एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्री.बाळासाहेब मनोहर भदाणे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य व गंगामाई आर्टस् ॲन्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.आर.पाटील, गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. व्ही.एम.पाटील व उपप्राचार्य प्रा. श्री.जी.एम.पोद्दार उपस्थित होते. गंगामाई अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेत कै.प्रथमेश भिमराव याचे अपघाती निधन झाले त्यावेळी जि.प.सदस्य तथा नगांव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.राघवेंद्र(राम) भदाणे यांनी सदर अपाघातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकास मदत मिळवून देण्यासाठी आपल्या गंगामाई अभियात्रिकी महाविद्यालयाच्या संबंधीतांना सुचना केल्या होत्या त्यानुसार महाविद्यालयाने ग्रुप इन्शुरन्स व विद्यार्थी कल्याण निधी मार्फत कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे सदर विद्यार्थ्याचा विमा प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानुसार सदर विद्यार्थ्याच्या पालकास महाविद्यालयाचा ग्रुप इंन्शुरन्स व विद्यार्थी कल्याण निधी मार्फत रुपये ५ लक्ष १० हजाराचा धनादेश मिळाला आहे. विद्यार्थी कै. प्रथमेश अहिरे याचे पालक श्री. भिमराव अहिरे यांना सदरचा धनादेश प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय यांचे आभार मानलेत.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post