महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूरच्या वतीने गरजू विद्यार्थांना अन्नदान करण्यात आले. शिरपूर दि.२७ (जितेद्र पाटील) दिनांक २७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूरच्या वतीने गरजू विद्यार्थांना अन्नदान करण्यात आले. महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या शिरपूर येथील पदाधिकाऱ्यांनी आज दि. २७ रोजी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतीमंद मुलांचे बालगृह येथे मुलांना अन्नदान करण्यात आले. व हिंन्दू ह्रदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची नेहमीच शिकवण ८०% समाजकारण व २०% राजकारण या उद्देशानेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण समाज हिताचे कार्य व्हावे या करता. आज अनाथ मतीमंद मुलांना अन्नदान करण्यात आले. अन्नदानामुळे मुलांच्या चेहर्यावर असलेले समाधान बघून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक राजू टेलर, विभाभाई जोगराणा, तालुका प्रमुख युवराज पाटील युवा सेना शहराधिकारी बबलू शेख, विधानसभा समन्वयक विकास सेन, म. वा. उपतालुका अध्यक्ष रूपेश मराठे, उपशहर अध्यक्ष महेश चौधरी, विशाल कोळी, गोपाल कोळी, विजय पारधी, संदीप धनगर, गणेश चौधरी, महेश जव्हेरी, सुदर्शन प्रसाद, धिरज चौधरी, ओम चौधरी, विकास जेव्हरी आधी शिवसैनिक पदअधिकारी उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0