-->

धुळे तालुक्यातील नगांव गावात कानबाई माता रोट व विसर्जन निमित्त गावात आढावा बैठक संपन्न. नगांव दि. २८ - धुळे तालुक्यातील नगांव गावात कानबाई माता रोट व विसर्जन निमित्त गावात आढावा बैठक संपन्न दिनांक २८ जुलै २०२४ वार रविवार रोजी रात्री ०८:०० वाजेला होळी चौक मारुती मंदिर जवळ घेण्यात आलेल्या कानबाई माता रोट व विसर्जन संदर्भात गावात ग्रामस्थानी एकत्र जमवून एक बैठक घेण्यात आली . या बैठकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच कानबाई मातेच्या रोट व विसर्जन पुढील प्रमाणे दिनांक १० ऑगस्ट रोजी भाजी भाकर चा रोट राहिल , दिनांक ११ ऑगस्ट रोजी कानबाई माता बसेल , आणि दिनांक १२ ऑगस्ट रोजी कानबाई मातेचे विसर्जन होईल या संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सर्व ग्रामस्थ मिळून एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कानबाई माता उत्सव हा सार्वजनिक असून या ठिकाणी कोणी राजकारण करू नये. तसेच राजकीय श्रेय घेऊ नये कार्यक्रम हा सार्वजनिक गावकऱ्यांचा असून राजकारण हे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षातल्या पुढार्‍यांनी तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र जमून कार्यक्रमास सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात यावा अशी गावकऱ्यांनी नम्र विनंती केली आहे. तसेच कानबाई मातेच्या विसर्जनाच्या दिवशी गावात कोणीही व्यक्तीने स्वता: व्यक्तीक डीजे लावू नये व्यक्तीक डीजे लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कानबाई माता उत्सव हा सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे ज्यांना कुणाला इच्छाशक्तीने देणगी द्यायची असेल तर त्यांनी सार्वजनिक बँड वाद्य साठी देणगी देऊ शकतात परंतु स्वतंत्र कोणीही व्यक्तीक डी जे लावू नये जर कोणी स्वतंत्र व्यक्तीक डी जे लावला तर त्या व्यक्तीला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आले आहे म्हणून कोणीही स्वतंत्र डी जे कोणीही लावू नये. कारण कानबाई माता उत्सव हा सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे आपण सार्वजनिक बँड वाद्य लावला आहे. कानबाई माता विसर्जन दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून तर साधारण दुपारी १२:०० पर्यंत कानबाई मातेची विसर्जन होईल आपण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन कानबाई मातेचे विसर्जन कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी ही देखील सर्व ग्रामस्थांनी राहिल असे या वेळी सांगण्यात आले आहे . तसेच कानबाई मातेच्या विसर्जनेच्या मिरवणुकीत स्वयंसेवकांची देखील नेमणूक करण्यात येणार आहे जे कुणी स्वयंसेवका साठी इच्छुक असतील सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपले नाव देऊ शकतात . तसेच ज्या महिला स्वयंसेविका साठी इच्छुक असतील त्या महिलांना देखिल जबाबदारी दिली जाणार आहे. कानबाई मातेच्या विसर्जनाच्या मिरवणुकी संदर्भात पोलीस प्रशासनाची देखील मदत घेण्यात येणार असून अशा पद्धतीने या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. कार्यक्रम अतिशय उत्साहीत व शांत पध्दतीत आणि जबाबदारी पणे साजरा करण्यात यावा असे सर्व गावकऱ्यांचा एक मतांनी ठराव करून एक निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच कानबाई मातेच्या उत्सव , रोट संदर्भात कार्यक्रमा विषयी गावकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post