-->

महाराष्ट्र वाहतूक सेना आणि शिरपूर फस्ट यांच्याकडून शिरपूर टोल यांना पळासनेर ते सावळदा फाट्यापर्यंत रस्ता सुधारून द्यावं यासाठी एन.एच.ए.आय.या कार्यालयास देण्यात आले निवेदन... शिरपूर दि. २३ (जितेद्र पाटील) - महाराष्ट्र वाहतूक सेना आणि शिरपूर फस्ट यांच्याकडून शिरपूर टोल यांना पळासनेर ते सावळदा फाट्यापर्यंत रस्ता सुधारून द्यावं यासाठी एन. एच. ए. आय. या कार्यालयास देण्यात आले निवेदन... शिवसेना महाराष्ट्रात वाहतूक सेना तसेच शिरपूर फर्स्ट यांच्यावतीने शिरपूर येथील टोलला निवेदन देण्यात आले, पळासनेर पासून सावळदे पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली असून त्याची तात्काळ सुधारणा करण्यात यावी, या बिघडलेल्या रस्त्यामुळे अनेकांचे जीव जात असून तरीदेखील टोल प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे असा आरोप महाराष्ट्र वाहतूक सेनेने लावला आहे. या रस्त्याची ताबडतोब सुधारणा झाली नाही तर शिवसेने स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील या वेळेस करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड, तालुका प्रमुख युवराज पाटील, अत्तर सिंग पावरा शहर प्रमुख अनिकेत बोरसे, तालुका समन्वयक मुकेश शेवाळे, मयूर पाटील, चेतन मोरे, विशाल कोली, चेतन पाटील, महेश चौधरी, विजय पारधी, संदीप धनगर, जावेद शेख, समीर शेख, ओम चौधरी, समाधान वाघ यादी उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post