मालपूर येथे आजाद समाज पार्टीचे शाखा उद्घाटन आणि पक्ष प्रवेश सोहळा संपन्न मालपुर दि.२१ - साक्री तालुक्यातील मालपूर येथे आजाद समाज पार्टीचे शाखा उद्घाटन आणि पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न आजाद समाज पार्टी पक्ष प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मालपुर ता.साक्री जि.धुळे या गावात शाखा उद्घाटन तसेच पक्ष प्रवेश सोहळा धुळे जिल्हाध्यक्ष पॅंथर आबासाहेब अमृतसागर यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. या प्रसंगी धुळे शहराध्यक्ष भैय्या वाघ व साक्री तालुक्यातील वरिष्ठ नेते मिलिंद दादा बच्छाव व चिंतामण थोरात धुळे तालुका अध्यक्ष , साक्री तालुका अध्यक्ष सुरेश वेंदे , धुळे उपाध्यक्ष किरण भालेराव, साक्री तालुका उपाध्यक्ष बाबाजी वेदें राजेश झाल्टे तसेच मालपुर शाखा अध्यक्ष मयूर बच्छाव, उपाध्यक्ष पंकज बच्छाव, गणेश बच्छाव विवेक बच्छाव , ऋषिकेश थोरात आजाद समाज पार्टीचे नवनियुक्त पदाधिकारीआणि महिला भगिनी, युवक व मालपुर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0