जि.प.सदस्य राघवेंद्र(राम)भदाणे यांच्या तर्फे मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजनेचे शिबीर गावो-गावी राबविले तालुक्यातील १० जि.प.गटात शिबीर संपन्न धुळे दि.२० - धुळे ग्रामीण मतदार संघात महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारची वैयक्तीक लाभाची कोणतीही योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि. प. सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या संकल्पनेतून आण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाण तर्फे गावो-गावी राबविण्यात येते. आता नुकतीच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली असून सदर योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे शिबीर आता पावेतो धुळे तालुक्यातील १० जि. प. गटांमध्ये पूर्ण झालेले आहे. धुळे ग्रामीण मतदार संघात अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाण तर्फे राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजना शासनाने जाहिर झाल्यानंतर ऑनलाईन नारी शक्ती दूत ॲप द्वारे दि. ०८ जुलै पासून रोजचे १० गावांना ऑन अर्ज भरणे प्रतिष्ठाण तर्फे सुरु आहे. आजपावेतो लामकाणी, कुसुंबा, शिरुड, रतनपुरा, बोरविहीर, आर्वी, फागणे, मुकटी, सोनगीर, निमडाळे गटातील प्रत्येक गावा-गावांत मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजनचे नारी शक्ती दूत ॲप द्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम पूर्ण झाले असून सोमवार दि.२२ जुलै पासून नेर, कापडणे, बोरकुंड, देऊर, नगांव जि. प. गटांतील लाभार्थ्यांसाठी सदर योजनेचे शिबीर सुरु होणार आहे. मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावा यासाठी आण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाणतर्फे सदर उपक्रम राबविण्यात येत असून आजपावेतो १० गटातील सुमारे १०० गावांतील लाभार्थ्यांचे नारी शक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्यात आलेले आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ महिला भगिणींना व्हावा यासाठी सदर योजनेचे शिबीर धुळे तालुक्यातील प्रत्येक गावांत राबविण्यात येत आहे. तालुक्यातील महिला भगिणींनी या उपक्रमाचे कौतुक केले असून जि.प. सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांचे आभार मानले आहेत.
byloksahi.varta.news
-
0