-->

भेटी लागे जीवा! माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥ शिंदखेडा दि.०९ - शिंदखेडा तालुक्यातुन अतिरिक्त जादा बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात याव्यात : शामकांत सनेर महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, येथे वारकरी संप्रदायाची अभिजात परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेली आषाढी एकादशी म्हणजे भागवत संप्रदायाचा सर्वांत मोठा सण. यानिमित्त लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. वारकऱ्यांचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शिदखेडा आगार प्रमुखांना विनंतीचे निवेदन दिले. या वेळी उपस्थित सुरेश देसले, सुनील चौधरी, दिपक देसले, दिनेश माळी, हाजी शब्बिर पठाण, कैलास वाघ, राजेंद्र थोरात, वसंत (भगत) पाटील. भटू पाटील. राकेश पवार उपस्थित होते


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post