-->

निजामपूर - 'यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय आणि महत्वाकांक्षा अंगी बाळगली पाहिजे' असे प्रतिपादन अँड. दत्तात्रय विठ्ठल घरटे धुळे यांनी केले.ते आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर (परवेज सैय्यद) दि.१० - निजामपूर-जैताणे ता.साक्री येथील विद्यार्थी विकास मंच तर्फे आयोजित 'वकीली व्यवसायातील संधी' या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून निजामपूर- जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक बारीक पगारे, सचिव नितीन शाह उपस्थित होते. महसूल न्यायालय,ग्राहक न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, धर्मदाय आयुक्त, सहकार न्यायालय, इन्कम टॅक्स ट्रब्युनल,मोटर अपघात न्यायाधिकरण, शाळा न्यायाधिकरण, विविध संस्थांची नोंदणी कामे, मॅट न्यायालय,फॅमिली कोर्ट अशी असंख्य ठिकाणी वकिली व्यवसायाला संधी असल्याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच न्यायालयात असलेल्या कर्मचारी पदाबाबत माहिती दिली. कायद्याची माहिती घेऊन समाजात जागरूकता निर्माण करणे,न्याय हक्कासाठी लढा लढण्याचे बळ या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते यातून आपल्या हातून समाजसेवा होत असते. वकिली क्षेत्रातील पुढील शिक्षणाचा प्रवास विषद करत विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे असे श्री घरटे यांनी पुढे बोलताना सांगितले. कार्यक्रमास प्राचार्य बी.आर.गावित, उपमुख्याध्यापक एन.एम.शाह,उपप्राचार्य ए.एस.भदाणे , पर्यवेक्षक एस.एस.शिरसाठ, विद्यार्थी विकास मंचचे प्रमुख मनोहर राणे,सर्व शिक्षक ,प्राध्यापक, शिक्षकेतर बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.आर.गावित यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय एम.डी. राणे यांनी केला.सूत्रसंचालन जे.डी.चिंचोले यांनी केले.उपस्थीतांचे आभार एल.आर.अहिरे यांनी मानले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post