निजामपूर - निजामपूर-जैताणे शिक्षण परिषदेचे आदर्श विद्या मंदिरच्या १९८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १८-१९ जानेवारी २०२५ रोजी येथील म्हसाई माता मंदिर येथे संपन्न झाला निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२४निजामपूर - जैताणे शिक्षण परिषदेचे आदर्श विद्या मंदिरच्या १९८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १८-१९ जानेवारी २०२५ रोजी येथील म्हसाई माता मंदिर येथे संपन्न झाला म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात आयोजीत १९८५ दहावी बॅचच्या मित्र-मैत्रींनींचा दोन दिवसिय स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.यात शनिवार दि.१८ रोजी दुपारी चार वाजे पासुन नोकरी व्यवसाया साठी स्थायीक झालेले मित्र-मैत्रीनी मोठ्या उत्साहात एकत्र येताना दिसत होते.रात्री भोजना नंतर आलेल्या मित्र-मैत्रीनींनी आपल्या शालेय जिवनाच्या आठवणींना उजाळा देत गाण्यांच्या भेंड्या,फिशपाँड,वात्रटिका रात्री शेकोटी कार्यक्रम सादर केला. ४० वर्षा नंतर आज हि शालेय जिवनातील असलेली स्नेहबंध मैत्री अभाधीत असल्याची भावना सर्वांच्या चेहर्यावर दिसत होता.शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेला आदर्श विद्या मंदिर येथे सर्व वर्ग मित्र एकत्र येऊन संस्थेचे संचालक व आपल्या गुरुजनाच्या प्रती ऋतज्ञता व्यक्त करण्या साठी वाजत गाजत व्यासपिठावर विराजमान केले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व संस्थेचे दिवंगत संस्थापकांच्या प्रतिमापुजन व अभिवादन केले.तसेच आदर्श विद्या मंदिरच्या कला शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गितमंचच्या चमुने इशस्तवन व स्वागतगित सादर केले.तसेच १९८५ दहावी बॅचची विद्यार्थीनी व सध्या डोंबीवली येथे संगित शिक्षिका शालिनी चिंचोले/मेखा हिने शाळेची आरती व गुरुवंदना सादर केले.तसेच आदर्श इंग्लिश मेडियम स्कुलच्या इ.५ वी च्या विद्यार्थ्यांनी महाभारत मधील द्रौपदी वस्त्रहरण नाटिका सादर केली.व त्या नंतर गुरुजनांचा व संस्थाचालकांचा यथोचीत सन्मान केला तदनंतर उपस्थित माजी विद्यार्थींनी आपल्या गुरुजना प्रति मनोगत व्यक्त केले.स्नेह मेळाव्यास आलेल्या मित्र-मैत्रीनीं मधुन ज्यांनी काही उल्लेखनिय किमगिरी केली आहे.अशा मित्र-मैत्रीनींचाही या वेळी सत्कार करण्यात आला.दहावी १९८५ बॅचच्या मित्र-मैत्रीनींचा स्नेह मेळावा व्हावा हे अनेक वर्षा पासुनची सर्वांची अपेक्षा होती.त्या साठी आदर्श विद्या मंदिरचे उपमुख्याध्यापक नितिन शाह, जि.प.प्रा.शाळा ढोलीपाडा येथील पदोन्नती मुख्याध्यापक नंदकुमार राणे,सेवानिवृत्त विजतंत्री मराविविकंचे प्रविण चिंचोले,बर्डिपाडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज बोरसे,माध्यमिक शिक्षिका डोंबीवली सौ.शालिनी मेखा,पत्रकार अनिल राणे,गोकुळ बदामे,भगवान धामणे,जितेंद्र चिंचोले यांनी स्नेह मेळाव्याचे नियोजन केले होते.स्नेहमेळाव्या साठी मुंबई,नाशिक,बुलढाणा,अमदाबाद,भरुच,बडोदा,अमळनेर,चाळीसगाव,विसरवाडी,साक्री,पिंपळनेर,धुळे येथुन मित्र-मैत्रीणी एकत्र आले होते.स्नेह मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र चिंचोले यांनी तर सुत्र संचलन युवराज बोरसे यांनी केले.
byloksahi.varta.news
-
0